Wednesday, April 17, 2019

हिंदवी महासागराकडून पराभूत होऊन
थेम्ब थेम्ब झालेला ओढा
हिंदवी त्सुनामीला आव्हान देत सळो कि पोळो करून सोडतोय
त्याला आपला मुख्य शत्रू प्रथम छिन्नविछिन्न करायचाय

अरबी आणि पॅसिफिकला ओढा वापरून घ्यायचा आहे
आणि ओढा पॅसिफिकला आणि अरबी समुद्राला नीट ओळखून आहे
आपण ह्या समुद्रांना नीट आव्हान दिलं तर
आपलीही महानदी होईल
ह्याचा त्याला अंदाज आहे

अरबी समुद्र थकलेल्या अरबासारखा दिसतोय
आपण पॅसिफिकपेक्षा फार वेगळे नाही आहोत
ह्याची त्याला नीट कल्पना आहे
तरीही तो पॅसिफिकमध्ये डिझॉल्व होत नाहीये

पॅसिफिक आपल्याला मुख्य समुद्र  म्हणून मान्यता देणार नाही
ह्याची त्याला नीट कल्पना आहे

बोटींना कळत नाहीये
हिंदवी आणि पॅसिफिक ह्यांच्यात फक्त नावाचा फरक आहे
कि पाणीही नावामुळे स्वरूप बदलते आहे ?

बंगालचा उपसागर स्वतःचा बर्फाळ नांगर टाकून
पाणी उपसतो आहे
त्याला आपण ओढा आहे कि नदी आहोत
हे कळेनासं झालंय
तो ते अजमावण्यासाठी स्पर्धेत उतरलाय

पाणी पाण्याशी स्पर्धा करतंय
आणि पाण्याला कळत नाही
ही स्पर्धा लादली गेलीये
कि आपण निवडलीये ?

पाण्याला माहितीये कि
सगळे महासागर सागर नद्या आणि ओढे
आपली निर्मिती आहे

ते त्या निर्मितीत स्वतःला पाहतंय

पाण्याला स्वतःला पाहण्याचा प्रचंड शौक आहे

पाणी फक्त स्वतःच्या अस्तित्वाला
ह्या आरश्यांच्यात पहात स्वतःच सौंदर्य कन्फर्म करतंय

बाकी पाण्याला माहित आहे
मान्सून आपणालाच धाडायचा आहे
आणि शेती आपल्यालाच करायचीये

पाणी शीळ घालत ढग उडवतय

==============================================

श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सीरीजमधील  आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

Thursday, April 11, 2019

पोस्टट्रुथ पो"यम "

ट्रुथ फक्त तूच आहेस
बाकी सगळं पोस्टट्रुथ

आनंदातही रडण्याचं
आणि रडतांनाही सेल्फी काढण्याचं युग आलं
तरी ट्रुथ फक्त तूच आहेस

किचन एक्स्प्लोर करताना अन्न तू आहेस

स्वर्गातून आणि नरकातून आरडाओरडा करणारे लोक
कुठल्या युगात न्हवते ?
अफवांच्यापुढे गुडघे टेकवणारे लोक
कुठल्या युगात न्हवते

गुडघ्यात मेंदू सरकवणारे लोक
कुठल्या युगात न्हवते ?


धर्म ही ह्या जगातली सर्वात मोठी फेक न्यूज आहे
ह्या फेक न्यूजवर विश्वास ठेवणारे लोक
कुठल्या युगात न्हवते ?

लोकांना गॅस सिलिंडर्स कितीही महाग झाली तरी
गॅसवर बसायचय

सारे आरसे मेड इन चायना झाले तरी
लोकांना त्यातच स्वतःला ब्युटीफुल बघायचंय

लोक चंद्रावर चढतायत
आणि स्मार्ट फोनमध्ये उतरतायत

फॅक्ट फॅब्रिकेट करता येते
आणि तू फॅक्ट नाहीस

टचस्क्रीनला टच करून
शरीर कमवता येईल का ?

पोटातली भूक कधी खोटं बोलत न्हवती ?
खोट्या वासनेने खऱ्या शरीरावर कधी बलात्कार केला न्हवता ?

डिस्क्रिप्शन इज डिसेप्शन
म्हणूनच तर तुझ्याविषयी मौन पाळावे लागते

विचार हाच प्रचार असतो
हे कुणी कुणाला सांगावे ?

अज्ञान पसरवण्याचा ठेका लोकांकडून मिळवणे
म्हणजे निवडून येणे

इग्नोरन्स कधीच इनोसन्स नसतो
तो एक धूर्त राजकीय चाल असतो

व्यसनी माणसांची मजल जास्तीत जास्त सेफ सिगारेटपर्यंत
मी निर्व्यसनी झालो
आणि तुझ्यात दाखल झालो

फक्त तूच  ट्रुथ आहेस
बाकी सगळं पोस्टट्रुथ
हे तेव्हा कळालं

अल्कोहोलिक रात्रीच्या उशाला झोपून
कुणाला सूर्य प्राप्त झालाय ?

बारमध्ये एक्झॉस्ट होऊन
कुणाच्या तारा शांत झालेत ?

संशय हा सुद्धा प्रोडक्ट म्हणून वापरणारा हा काळ

साक्षात्कार सेलला लागले
कि रद्दीत जातात

दारूने लिव्हर खराब होते कि नाही
सिगरेटींनी कॅन्सर होतो कि नाही

तथ्य काय ?

शरीराबद्दलही अफवा उडायला लागल्या कि समजावं
अर्थकारण राजकारण झालंय

कवी विचारवंत पत्रकार
सिग्रेटी ओढत बारमध्ये बसून
पोस्टट्रुथ विषयी डिस्कशन करतायत
हे विनोदी नाही काय ?

मी पूर्वी बारमध्ये बसून कोल्ड ड्रिंक प्यायचो
आता फक्त लिंबूपाणी पितो

जग टेबल मांडून बसल्यावर हे अटळ

टेबलावर उगवणारे हजारो चंद्र मीही पाहिलेत
पेगच्या खिडक्या खुल्या झाल्या कि
हे विश्वची माझे घरचे येणारे फेक फिलिंग
मीही अनुभवलंय

मी वेगळा होतो तो इथेच
मी कधी स्वतःला चूना लावला नाही

मेंदूच्या तरंगणाऱ्या उडत्या तबकड्या
आणि दारू पिऊन एलियन्स झालेले माझे दोस्त

फेक काय आहे ?

दारू पिऊन लिव्हर खराब होते हे फेक
कि हे सत्य माहित असूनही दारू पिणारे माझे हे चर्चिलवादी दोस्त फेक ?

मर्यादेत दारू पिली तर चांगली
कुणाच्या भल्यासाठी मर्यादेत खोटं बोललं कि ते चांगलं
ह्या दोन वाक्यात फरक काय आहे ?

युवल हरारी किंचाळतोय
एव्हरीथिंग इज मिथ
आणि धर्म म्हणतायत
" या या सर्वोत्कृष्ट मिथ्स आमच्याकडे आहेत
आमची प्राचीनता स्वस्त आणि टिकाऊ
हजारो वर्षे सिद्ध झालेली "

मोदी आणि ट्रम्प
प्रॅक्टिकली अनवरकेबल आहेत
कारण ते सोल्युशन म्हणून मिथ पुरवतायत

वंचित आत्मवंचित
तिसरी आघाडी कि तिसरी मिथ
आमच्याकडे जातीनिष्ठ उमेदवार मिळतील
मात्र आम्ही जाती अंताचा लढा लढतो आहोत
मात्र आम्ही बौद्धांच्या जाती जाहीर करणार नाही
कारण बौद्ध धर्म जात पाळत नाही

संविधान म्हणजे भीमस्मृती
आणि स्मृती अपरिवर्तनीय असतात

संशयाचे व्यापारी आणि पायरेट्स ऑफ कॅरिबियन्स ह्यांच्यात फरक काय

राहुल गांधी जॉनी डीपहुन देखणे नाहीत काय
शिवाय त्यांच्याजवळ जादूचा पारंपरिक पारिवारिक कम्पास आहे

काँग्रेसचं राजकीय जहाज कुणी बनवलं आणि का
ते कुणाच्या मालकीचं आणि का

मिंटो ओरडतोय १९०७ पासून
ऍरिस्टोक्रेटीक डेमोक्रसी इंडियासाठी आवश्यक आहे

सलमान खान म्हणतोय
मी मेडीओकर टॅलेंट आणि लकवर तगलो

माझा हितेशी विचारतोय
संन्याशाने राजकीय का बोलावे
ट्रुथभी गया भाडमे पोस्टट्रुथभी गया भाडमे
आश्रम डाल धंदा कर
ईश्वर सबसे बडी कमोडिटी हैं

अनिश्चितता सहन करायला गांडीत दम लागतो
तो नसला कि
लोक सत्य म्हणून काहीही स्वीकारतात

आश्रमाचे मूळ ह्या अनिश्चिततेत असते

न आवडलेलं सत्य फक्त एक अल्टर्नेटीव्ह ट्रुथ आहे
आजच्या जगात

मी काळा चंद्र आहे
जो अमावस्या दूर करतो

सूर्य का नाही

तो सर्वत्र आहे
आणि माझ्यासारख्यांना प्रोजेक्ट करतो आहे

रहस्यांच्या  घनदाट जंगलाची झाडेतोड चालू आहे
पाणितोड चालू आहे
हवातोड चालू आहे

माझी हवा कोणी चोरली
माझे पाणी कोणी चोरले
माझे जंगल कुणी बळकावले

कॉन्स्पिरसी थेरिंची भरभराट
प्रश्न सोडवणार आहे का ?

शिव पाचाडे आणि सुनील बार्गे
नजीकच्या इव्हेंटमध्ये इंटरेस्टेड आहेत

माहिती पोहचतिये नोटिफिकेशन द्वारे
पण त्यांचे तथ्य पोहचते काय

आपण सर्व ऍक्सेसिबल झालोय
फॅक्चुअलेबल  झालोय का ? ऍक्च्युअलेबल  ?

फेसबुक चेहऱ्याचा आभास आहे
पूर्वीही चेहरा आभास न्हवता का ?
न्हवता न्हवता न्हवता

इंटरनेटवर काहीही फेंकता येते
प्रत्यक्षात फेंकायचे असेल तर डीपली अभिनय करावा लागायचा
आणि अनेकदा तो उघडा पडायचा
म्हणजे प्रश्न अभिनयाचा आहे तर

ज्याच्या त्याच्या अभिनयानुसार खरं आणि खोटं

हाथीपे उंगली रखो
कमलतक पहुँच जायेगी
कमल खिलेगा
जंगलमे मंगल हो जायेगा

सुव्रत जोशी सखी गोखलेच शुभ मंगल
इस मंगलमे ये शुभमंगल कहांसे आया भाई
नोटिफिकेशन बंद करो

चारोतर्फ न्यूज है
बीचमे मीडिया
हरतर्फ गोपिया
पत्रकार कन्हैया

लोकसत्ता WWW
कॉम कॉम

इलेकट्रीसिटी बिल मिला ?
सर कविता लिख रहा हूँ
वो ठीक हैं इलेकट्रीसिटी बिल मिला ?

कविता विजेसारखी असते ९९ टक्के लोक जळून जातात
नाही नाही नाही
९९ टक्के लोक विजेची बिल भरतात
आणि आयुष्यभर लोड शेडींग झेलतात

मी ऍक्सेसिबल असल्याची किंमत म्हणून ही कविता इथेच सोडून
वीजबिल शोधून देतोय

डिस्टर्ब् होनेका नही
जो डिस्टर्ब् होता है
वो कविता कम्प्लिट किये बिना मर जाता हैं

मैंने कविता कम्प्लिट की हैं
तुझ्यात बसून

श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सीरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

*****