Thursday, July 13, 2017

उजूवरच्या आत्ताच्या कविता 

फ्लॅश २०१६ श्रीधर तिळवे 


अबोली माळणाऱ्या बायकांच्या घोळक्यातून 
तुला वेगळा वास येतोय 

प्रत्येक विंडोतून काळी ग्राफिटी वाऱ्याला चावतीये 

वीजबद्ध ढगांतून घरघर ऐकू येतीये 

चूका स्वतःला करेक्ट करत नाहीयेत 
स्क्रोल होतायत 

हे  रँडम इव्हेंट नाहीत  
हे  मला येणाऱ्या फ्लॅशेसचा दरवळ आहेत  


तू हात पुढे करतीयेस आणि विचारतीयेस 
राजू , अजून आयुष्य किती 
आणि हाताचा पडदा फडफडतोय 

दृश्ये डिस्चार्ज होतायत 
तुझ्या नाकपुडयातून रक्ताची संततधार ओघळतीये 
ओठांवर दोन काळ्या वीजा व्हिसा मिळवून 
थेट तुझ्या तोंडात लँड होतायत 
माथ्यावर प्लाझ्मा वाळू ढवळतोय 

एक प्रेत माझ्याशिवाय पुढे चालते आहे 
आणि मी माझे पाय बर्फात गोठून स्थिर 

''उजू , येणारे सहा महिने काळजी घे 
हे जगशील तर आणखी वीस वर्षे जगशील ''


आपण सहज उठून चालायला लागतो 
तू किचनकडे 
मी दाराकडे 

अनंताच्या झाडावर कावळा येऊन बसलाय 
आणि एक माकड समोरून हाय जम्प घेऊन थेट माझ्या पायावर 

''माणसं काय कमी होती 
जी माकडंही तुला नमस्कार करायला लागली ''
आई हॉलमधून विचारतीये 
मी फ्लॅशेसमधून बाहेर पडून 
माणसांच्यात लॅन्ड होतोय 


ते अवतरतंय अवतार घेता 
मूळ हेच ज्याचे फूल आहे 
आणि ज्याला  अमृताचे झाड म्हणतात 

माझ्या देहात पुन्हा शिशिराला बळी पडणारी सुवर्णपाने झुळझुळतायत 
आणि तू सुवर्णप्रकाशात न्हात म्हणतीयेस 
''मी काळजी घेईन ''

तुझ्या माझ्या दरम्यान एक पूर्णविराम 
मी पूर्णात 
तू विरामात 
***********************************

कॅन्सर झाल्याची वार्ता आली तेव्हा श्रीधर तिळवे नाईक 

दुःखांना कॅडबरीत गोड करून जखमांना रॅपरवर चंदेरी बनवत 
दुखणाऱ्या दातांना लागलेली मर्त्यतेची कीड अमूर्ततेत सजवत 
म्हाताऱ्या होत चाललेल्या हातांना तरुण राहिलेल्या गालावर ठेवत 
म्यूट झालेल्या चेहऱ्याला शांततेचा डायनामाईट पाजत 


हवा वादळतीये 


कामवासनेचा अंत झालेल्या देहापुढे  केवळ फॅण्टसी म्हणून उरलेल्या भाषेतून 
सांगावे कि सांगावे ह्या अडकित्यात अडकलेल्या गळ्यातून

प्रिया सांगतीये मोबाईलमधून 
''उजू ऑंटीला  कॅन्सर  झालाय ''

कानात शिसे ओतले जाऊन श्वासात त्याचे सुवर्णकण होतायत 

अनंताचा दरवाजा काही काळ बंद 

चैतन्याचे कारंजे उडायचे थांबत नाहीयेत 
पण स्तब्धतेचा दागिना बनून तो चमकतोय 


पुस्तकांचे अवाढव्य पसारे पिसारे टाकून मोरात परततायत 
झी टीव्हीचे स्पेशल लाकडी टेबल स्वतःचे लचके तोडतंय 


खिडकीबाहेरचा आंबा वास ऑफ करून माझ्या आयुष्याबाहेर जातोय 

एरटेलचा लाल आणि क्रिम कलर थोडा काळवंडतोय

माझी खोली तुला पाहण्यासाठी  थोडी उथळ होतीये  


 

मी मोबाईल घेऊन आवाज नीट यावा म्हणून बाहेर रेंज चाचपडत 

प्रिया रडतीये 
'' तुला सगळं दिसतं ना मग सांग वाचेल कि नाही ''
'' ती सहा वर्षे ऑलरेडी एक्स्ट्रा जगलीये प्रिया मी तिला आधीच काळजी घे म्हणून सांगितलं होतं  ''
'' ती वाचायला हवी कदाचित कॅन्सर नसेलही तू बघ ना मेडिटेशन करून ''
''ठीक आहे मी बघतो ''

माझा आवाज ऑफ 
अनंत पुन्हा सर्वत्र ऑन 


माझ्या डोळ्यांजवळ ओपिनियन राहिलेले नाहीत 
मतांचा मूर्ख गलबला कॅन्सरपुढे चालत नाही 
तो असतो किंवा नसतो 
मी पाहतो 
तो आहे 


 

मी थंड आवाजात चालत जातोय पाणी पिण्यासाठी 
माझी नस ताल पकडत हवेचा तबला वाजवतीये 
प्रॉडक्शनच्या ट्रँकांचा ग्रे रंग उडत चाललाय 

प्रियाचा नम्बर चमकतोय 

मी अस्तित्वाचा आरसा काळ्या रंगात दाखवतोय 

माझ्या वाक्यातले विराम तिला कळतायत 
मात्र ते स्वल्पविराम कि पूर्णविराम  ते तिला कळत नाहीये


 

लॅपटॉपचा काळा रंग गडद भासतोय 
विरामांचा अनंतावर काहीही परिणाम नाहीये 
ऊर्जा आधिक शांत 
कीजच्या बाहुल्या डोळ्यांना उपसतायत 

मी माझी कामे प्रोफेशनली पुरी करत 

स्वीकाराच्या आरंभी आणि अंतावर अनंत आहे 

नेती नेती सर्वत्र न्हेतय 

मी फोन करून सर्व मीटिंगा कॅन्सल करतोय 

सूर्याची तजेलदार किरणे खिडक्या उघडतायत 

दरवाजा उघडलाय 
एव्हढंच बघायचंय 
तुझ्या काळजात सूर्य कि मृत्यू ?

**************************************************************************** 
हॉस्पिटलकडे श्रीधर तिळवे नाईक 

तुम्ही दोन गोष्टींकडे डोळे उघडे ठेवून पाहू शकत नाही 
सूर्य आणि मृत्यू 

स्मृती आणि पुस्तके ह्यांच्यात फरक नसतो 
दोघेही सारखेच टाकाऊ असतात 

आयुष्यभर तू सेक्स दाबलास 
पण मृत्यू दाबू शकशील का ?

माझी नाजूक इंद्रिये थोडी कठीण झालेत अलीकडे 
सेन्सिटिव्हिटी डेन्सिटी झाली कि असं होतं 

तुझे फोटो गूगल फोटोशॉपमध्ये 
आंधळ्या डोळ्यांनी मला पाहतायत 

ते वाट पाहतायत  
मी तुझ्या शरिराकडे कधी वळतोय ह्याची 

मी  नेटवर जाऊन मुंबई मिरज चेक करतोय 
आणि नेहमीच्याच रत्ना ट्रॅव्हलवर वळतोय 

रेल्वे कायमच आऊटडेटेड असते आणिबाणीत 
आणि विमानप्रवास हवाहवाई होतात छोट्या अंतरात 

मी स्लीपर कोच बुक करतो 
आणि काळात भरलेला  काळा फील 
अंगाला लागू न देता बॅगेकडे वळतो 


माझ्या चुकांचे पुतळे बाजूला सारत 
मी सामान भरतोय 
ऍसिडने जळलेल्या त्वचेच्या प्रत्येक तुकड्यासाठी 
मला स्वतंत्र टॉवेल लागतो 
प्रत्येक वस्तूचा एक पीच असतो 
मी आवाज न करता कपड्यांचा  साऊंड भरतोय 
आणि आकारही 

ट्रॅव्हलिंग बॅग ही एखाद्या खंडासारखी असते 
आणि तिच्यातील देश सारखे बदलत असतात 

ह्यावेळीही काही देश बदलतायत 
आणि मी त्यांना मार्गी लावण्यासाठी 
प्रवास सुरु करतोय 


रोगसाक्षर प्रवास हे त्रिशंकूसारखे लोम्बकळतात 
मला तुझे खांदेपालट दिसतायत 
गोवा मेडिकल्स आधार हॉस्पिटल 
फेसबुकवर एक कॉमेंट भिरकावून मी चाचपडतोय 
योग्य उपचारांची ठाणी 
मोबाईल स्पर्शावर कॉन्टॅक्ट नाचवतोय 
आणि डोळ्यांपुढे वारंवार डिलीटची कि डान्स करतीये 

बाळकृष्ण शिर्के जयसिंग पाटील मिलिंद गुर्जर 
विलास कांबळे प्रदीप निफाडकर 
कोण कोण कामाला लागलेत 

अमोल कडोलीकर म्हणतोय 
'' तिला सुखाने मरू दे मी आधी तुझा मित्र आहे मग डॉक्टर 
माझा मेव्हणा असाच गेला थेट अमेरिकेत पोहचुनही आणि एवढे मोठे हॉस्पिटल असूनही नाही वाचवू शकलो तुझ्या बहिणीची केस वेगळी नाहीये तिला सुखाने मरू दे '' 

प्रिया म्हणतीये 
''नाही ! प्रयत्न करायलाच हवा ."

ती नेटवर जीवनाची गॅरंटी देणारं हॉस्पिटल शोधतीये


फेसबुक पुरेसं ठरत नाहीये 
मोबाईल नकारघंटा वाजवत शरीरात येजा करतोय 
बायजी भावोजी आणि तू अचानक मोबाईल बॉडी झालाय 
आमच्या बदलत्या डेटाप्रमाणे  तुम्ही ठिकाणं बदलताय 

प्रत्येक क्षणी वेगळे शहाणपण 
प्रत्येक मिनिटाला शरीराचा वेगळा ढग 

मृत्यू समुद्रासारखा सर्वत्र दबा धरून  
आणि तू समुद्राला हरवणार म्हणून 
हातात बिसलरी बॉटल गच्चं पकडून 
थेम्ब थेम्ब पाणी पितीयेस

५ 
लढाया मित्रांच्याशिवाय घरच्यांच्याशिवाय लढता येत नाहीत 
सुदैवाने बाळकृष्ण जयसिंग मिलिंद सोबत आहेत 

त्यांनी तुला खुर्चीत बसवून तीन मजले चढवले आहे  
आणि तू शरीरातील पाणी गदागदा हलत असूनही 
त्याला समुद्रात विरघळू न देता 
स्वतःला सॉलिड बर्फ बनवून तीन मजले चढली आहेस 

भावोजींच्या श्वासांची उलाढाल मला स्पष्ट दिसतीये 
आणि बायजींच्या हाडांची ठाम उलाघालही 

एक हिवाळा ठोसे मारत आपल्या श्वासातील हवा मोजतोय 
आणि आपण आपल्या प्रयत्नात गॅप पडू नये म्हणून डोळे जागे ठेवतोय


पेशींचा अतोनात पाऊस 
आणि तो सहन न होऊन सुकाळाने अवकळा प्राप्त झालेले लिव्हर 

तू तुझं सफरींग अधिकाधिक अदृश्य ठेवण्याचा प्रयत्न करतीयेस 

स्वतःच्या खांद्यावर स्वतःचेच ओझे 
वेदनांचे बोझे विखुरलेले 

मरणाचा विचार व्यभिचार कि वेडाचार ?

विषाणूंना लॅन्ड व्हायला विमानतळ लागत नाहीत 
ते थेट दाखल होतात 

माझ्यावर तुझ्या मृत्यूचं प्रेशर नाहीये 
फक्त करुणा आहे 
जी ह्या क्षणी वांझोटी आहे

७ 
सम्पूर्ण मुंबईवर तुझ्या कॅन्सरचा बुरखा चढलाय 
आणि संपूर्ण नगरी पेशन्टसारखी दिसतीये 

मुंबईत दाखल होणारा माणूस 
ऍडमिट व्हायलाच येतो 

महत्वाकांक्षा ही  ह्या नगरात संसर्गजन्य आहे  
आणि प्रत्येकाच्या डोळ्यात ती माशीसारखी बसलेली आहे 

मी माश्या उडवत चाललोय 

माझ्या शरीरातील राख जॉईंट व्हेंचर नाही 
तिने माश्या उडतात आणि पुन्हा डोळ्यात जाऊन बसतात 

माझे स्मशानवैराग्य रिक्षा थांबवतंय 
आणि मी प्रकाशात बसून गोरेगाव वेस्टकडे निघतोय 



मांजरांच्या सावल्या वाघाला डिस्कवर करतायत 
कुत्र्यांच्या काया प्राण्यांचा शिल्लक ट्रॅफिक अधोरेखित करतायत 

एक माणूसच काय तो मुबलक आहे सर्वत्र 
आणि तरीही तो जगावा असं सर्वांनां वाटतं 

मलाही तू जगावीस असं वाटतंय 
मी स्लीपर कोच विकत घेतोय 
आणि झोप मँनर्स पाळत येऊ का विचारतीये


कॅन्सर एक अब्रप्ट मॉडिफिकेशन आहे 
जे वाक्याच्या शेवटी कळते 

शरीराला मूर्ख बनवून पळून जाणारं हे कार्ट 
तुझ्या वाट्याला यावं हा दैवदुर्विलास 

सोबत काविळीची पिवळी सिम्फनी 

पिवळा रंग इतका डेंजरस होईल असं कधी वाटलं होतं ?

तुझ्या एकांतात माझी मुक्ती प्रवेश करत नाहीये 

कॅन्सरच्या वेटिंग लिस्टवर सर्वांचीच नावे 

तू त्याच्या ट्रेनमध्ये आहेस हाच काय तो फरक 

१०
मी भूक लागली कि जेवतो 
झोप लागली कि झोपतो 

मृत्यू लागला कि मरेन 

ह्या क्षणी मी जिवंत आहे  
आणि झोप मला व्यापत चाललीये 

११

मी वॉनलेस इस्पितळाच्या दारात उभा आहे 

अनंताच्या खिडक्या उघडलेत 
सूर्य फ्रेश किरणे पोहचवतोय 

सौन्दर्य  क्रूर होऊ शकत नाही 
मृत्यूच्या दारातही 
उलट ते मृत्यूलाही सुंदर करून जाते

मला प्रचंड लघवी लागलीये 
आणि समोरून भावोजी 
टेन्शन नेसून येतायत 

बायजींचा मर्त्य चेहरा स्पीचलेस झालाय 
कित्येक लाटांचा भुगा तिच्या कपाळावर जमा 

एखाद्या महालढाईत योद्ध्यांची  शरीरे नाहीशी होऊन
फक्त शस्त्रे शिल्लक राहावीत तसे दोघे शिल्लक 

मी प्रथम मुतून घेतोय तुंबलेल्या मुतारीत  

हळूहळू पुन्हा तंबोरा जुळू लागलाय 

मी तुझ्यासमोर उभा आहे 

तुझं हास्य फिकं उमलतंय 
कायम आनंदाने जगलेले तुझे डोळे फिकट झालेत 

'' मी जगणार रे राजू 
मरायला थोडीच एव्हढा लांबचा प्रवास करून इथंवर आलीये ?''
**************************************************  
उजूवरच्या किंवा उजूमुळे आलेल्या कविता - श्रीधर तिळवे नाईक


भाग पहिला 
मृत्यूच्या दारातून लाईफ स्पष्ट दिसत का ?

आजूबाजूला मृत्यूची एन्क्वायरी चालू आहे
आणि मी शांत डोळ्यांनी तुझा कॅन्सर पहात
तुला जाऊ द्यावं कि तुला राखावं ह्याचा विचार करतोय

नात्यांच्या पलीकडे पोह्चल्यानंतरही
अलीकडे नाती शिल्लक राहतात

मृत्यू येत नाही तोवर
अलीकडे संडासासारखा अटळ आहे

बायजी भावोजी मी भारत भूषण

एका अपरिहार्य भावण्डमंडळात आपण जगलो
आणि आता
एकमेकांचा मृत्यू अजमावत
कोण आधी जाणार ह्याचा अंदाज घेत
आपण एकमेकाला अधिकाधिक ओळखत चाललोय

आपल्या मंडळातून दत्ता दादा निघून गेलाय
आणि आता तू अशी नक्षत्रांच्यावर आदळत
चंद्र ग्रहणांच्यात टोलवत

तुझ्या लहानपणापासूनच्या कित्येक आठवणी ओथंबतायत
फ़ळं आलेल्या तुझ्या जीवनाच्या वृक्षाला लटकतायत


बागा तुडवत जाणाऱ्या जगात आपण जन्माला आलोय
ह्याचा जिच्यावर बसून शोक करता येईल अशी फांदी कुठाय ?

आपल्या पेशी म्हणजे आपली पान
तीच वाढत जाऊन वृक्षाचा खून करणार असतील तर
वृक्षाने पानांना काय अर्थ द्यावा ?

कॅन्सर हा सर्वच बुद्धांचा आवडता रोग आहे
जेव्हा तो त्यांना होतो 

पण जेव्हा तो नातेवाईकांना होतो 
तेव्हा त्यांचा जीवन वाढवणारा स्पर्श
नातेवाईकांचा कॅन्सर डबल वेगाने वाढवतो

फक्त जीवन वाढवणारे हात इथे मात्र चक्क शत्रू होतात

मी तुला स्पर्श करत नाहीये
आणि तुला कळत नाहीये
मी तुला स्पर्श का करत नाहीये

तुझे डोळे मृत्यूतही सळसळतायत
आणि मी तुझा मृत्यू डोळ्यांनी पेलत
कसा लांबवता येईल ह्यावर सर्वत्र असून चिंतन करतोय

उजूवरच्या किंवा उजूमुळे आलेल्या कविता - श्रीधर तिळवे नाईक

भाग दुसरा 
तू माझी काय आहेस 

सख्खी बहीण 
जुळी आयडेंटिटी 
थोरली दुःखाची कुळी 

तुझ्यावर लिहिलेल्या कविता प्रकाशित करण्याचे धाडस 
मला कधीच झालं नाही 

तुझ्या दुःखाचा भाषिक अंदाज घेणे हाच क्राईम वाटायचा मला 

बुद्ध  झालो म्हणून काय झालं 

कवितेत बायका पेलता येत नाहीत हेच खरं 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

कॅन्सर झाल्याची वार्ता आली तेव्हा श्रीधर तिळवे नाईक

दुःखांना कॅडबरीत गोड करून जखमांना रॅपरवर चंदेरी बनवत
दुखणाऱ्या दातांना लागलेली मर्त्यतेची कीड अमूर्ततेत सजवत
म्हाताऱ्या होत चाललेल्या हातांना तरुण राहिलेल्या गालावर ठेवत
म्यूट झालेल्या चेहऱ्याला शांततेचा डायनामाईट पाजत


हवा वादळतीये


कामवासनेचा अंत झालेल्या देहापुढे  केवळ फॅण्टसी म्हणून उरलेल्या भाषेतून
सांगावे कि न सांगावे ह्या अडकित्यात अडकलेल्या गळ्यातून

प्रिया सांगतीये मोबाईलमधून
''उजू ऑंटीला  कॅन्सर  झालाय ''

कानात शिसे ओतले जाऊन श्वासात त्याचे सुवर्णकण होतायत

अनंताचा दरवाजा काही काळ बंद

चैतन्याचे कारंजे उडायचे थांबत नाहीयेत
पण स्तब्धतेचा दागिना बनून तो चमकतोय



पुस्तकांचे अवाढव्य पसारे पिसारे टाकून मोरात परततायत
झी टीव्हीचे स्पेशल लाकडी टेबल स्वतःचे लचके तोडतंय


खिडकीबाहेरचा आंबा वास ऑफ करून माझ्या आयुष्याबाहेर जातोय

एरटेलचा लाल आणि क्रिम कलर थोडा काळवंडतोय

माझी खोली तुला पाहण्यासाठी  थोडी उथळ होतीये




मी मोबाईल घेऊन आवाज नीट यावा म्हणून बाहेर रेंज चाचपडत

प्रिया रडतीये
'' तुला सगळं दिसतं ना मग सांग वाचेल कि नाही ''
'' ती सहा वर्षे ऑलरेडी एक्स्ट्रा जगलीये प्रिया मी तिला आधीच काळजी घे म्हणून सांगितलं होतं  ''
'' ती वाचायला हवी कदाचित कॅन्सर नसेलही तू बघ ना मेडिटेशन करून ''
''ठीक आहे मी बघतो ''

माझा आवाज ऑफ
अनंत पुन्हा सर्वत्र ऑन



माझ्या डोळ्यांजवळ ओपिनियन राहिलेले नाहीत
मतांचा मूर्ख गलबला कॅन्सरपुढे चालत नाही
तो असतो किंवा नसतो
मी पाहतो
तो आहे




मी थंड आवाजात चालत जातोय पाणी पिण्यासाठी
माझी नस ताल पकडत हवेचा तबला वाजवतीये
प्रॉडक्शनच्या ट्रँकांचा ग्रे रंग उडत चाललाय

प्रियाचा नम्बर चमकतोय

मी अस्तित्वाचा आरसा काळ्या रंगात दाखवतोय

माझ्या वाक्यातले विराम तिला कळतायत
मात्र ते स्वल्पविराम कि पूर्णविराम  ते तिला कळत नाहीये




लॅपटॉपचा काळा रंग गडद भासतोय
विरामांचा अनंतावर काहीही परिणाम नाहीये
ऊर्जा आधिक शांत
कीजच्या बाहुल्या डोळ्यांना उपसतायत

मी माझी कामे प्रोफेशनली पुरी करत

स्वीकाराच्या आरंभी आणि अंतावर अनंत आहे

नेती नेती सर्वत्र न्हेतय

मी फोन करून सर्व मीटिंगा कॅन्सल करतोय

सूर्याची तजेलदार किरणे खिडक्या उघडतायत

दरवाजा उघडलाय
एव्हढंच बघायचंय
तुझ्या काळजात सूर्य कि मृत्यू ?

****************************************************************************

हॉस्पिटल ३  श्रीधर तिळवे नाईक 



तुम्ही कायतरी म्हणून मरू शकता
कॅन्सरमध्ये कॅन्सरचे पेशन्ट म्हणून मरता




ऍलोपॅथी जेव्हा गुढगे टेकते
तेव्हा माणसे आयुर्वेदात हाय जम्प मारू पाहतात

"तिला सुखाने मरु  दे "
अमोल कडोलीकरचा खिन्न आवाज माझा पाठलाग करतोय

आपण जसे जन्मलो तसे मरू शकत नाही

रोगांचे अनेक वास ह्या वॉर्डात दर्वळतायत
फक्त तूच एक अशी
जिला कॅन्सर बनावट वाटतोय



प्रिया प्राण पणाला लावून समांतर पाठलाग करतीये
तिचे डोळे लॅपटॉपमध्ये बुडवून
नेट लावून धरणे अंगावर येतंय

योगेश बेंडाळे पासून पांढऱ्या कांद्यापर्यंत
काय काय चालून येतंय

तुझ्या विविध टेस्टचे स्कॅनिंग करत मी रिपोर्ट तपासतोय

काविळीचा पिवळाधम्म साप संपता संपत नाहीये

मिलिंद गुर्जर म्हणतोय लिव्हर स्वतंत्रपणे वाढू शकते
ते वाढण्यापुरते टिकले पाहिजे

मी टिकवण्याच्या शक्यता चाचपतोय

पेशींची नव्याने लागवड करून नवे लिव्हर तयार करता येईल का

काळजाचा प्रश्न असता तर तू स्वतःच सोडवला असता

पण हे पडले जैविक यकृत

तेच विकृत झालंय आणि वर दशांगुळे उरलेली कावीळ

कुणाला गोष्टी स्पष्ट दिसायच्या बंद झाल्या कि आपण म्हणायचो
त्याला नजरियाची कावीळ झालीये

आणि आता तुलाच कावीळ झाल्यावर नजरियाला काय म्हणायचे ?



हॉस्पिटलमध्ये मोबाईल वापरायला परमिशन नाहीये
म्हणून वरखाली करत
मी झोके घेतोय

तुझ्या रोगाइतकं रिअल ह्या क्षणी काहीच नाही

औषधांमागून औषधे लिहिली जातायंत
आणि आम्ही कुत्र्यासारखे धावत
ती पकडून आणतोय

आपण निवडलेले हॉस्पिटल योग्य आहे कि नाही
ही शंका संपता संपत नाहीये

सरकारने गरीब लोकांना फक्त मरायला सोडून दिले आहे
ह्याची प्रचिती वारंवार ठणकतीये

नर्सेसचा पांढरा रंग ढगासारखा लगबग करतो
आणि पाऊस न पाडता निघून जातो

हॉस्पिटलचा ऋतू एकच हिवाळा

माणसाचे शरीर एरव्ही पाण्यासारखे वहात असते
त्यात बर्फाच्या गुठळ्या झाल्या कि
माणसे अवयवांचा  पाचोळा
गोळा करत करत
इस्पितळात पोहचतात

माझ्यापुढे दर दहा मिनिटाला एक नवा पाचोळा ऍडमिट होतोय
आणि बर्फाचा करकर आवाज करत खाटेवर टेकतोय

मी तुझा पाचोळा उदास नजरेने पहात तुला आधार देतोय
आणि तू ह्या पाचोळ्यापासून झाड तयार करणारी विद्या
तुला अवगत असल्यासारखी हंड्रेड परसेंट पॉझिटिव्ह



मुखवटे गृहीत धरण्याची माझी सवय गळून गेल्यापासून
चैतन्य शेकडो चेहऱ्यांनी मला भेटतंय

आयुष्याला आजार समजणारे लोक मला बावळट वाटतात

विलास आणि शरयू अस्सल चेहऱ्याने चालून येतायत

तुझी काळजी आणि चौकशी
जिव्हाळा आजारातून लंगडत लंगडत चाललाय

आपल्यापैकी कुणीच ही स्थिती इमॅजिन केली न्हवती

शॉक तर सगळ्यांनाच लागलाय
पण बल्ब प्रत्येकाचा ऑन  आहे



हा क्षण मृत्यूचा नाही
पण पुढील क्षण मृत्यूचा असू शकतो
ही शक्यता काल्पनिक आहे
पण प्रत्येकजण तिच्याखाली चेपला जातोय

माणसे भाषेमुळे अनेक गोष्टी काल्पनिक करतात
मृत्यू त्याला अपवाद नाही

'' स्वतःला समजण्यासाठी तरी स्वतःपुरता जागा हो
जगाला जगण्यात किती जागा देशील
इतकी कि स्वतःला जागाच उरू नये ?''

मी भविष्याने सतत काळवंडलेल्या एका पेशन्टला बोलतोय
आणि तो होहो म्हणतोय

तुझ्या नसा फडफडतायत
तडफडतायत
चडफडतायत

एव्हढ्या कठीण वेदनेतही स्वतःच्या जीवावर
संडासला जाण्याची तुझी जिद्द कायम आहे


तू दोन्ही टोकांकडून  प्राणांतिक आहेस
म्हणूनच तू उज्वला तिळवे आहेस



तुझ्या त्वचेनं सगळंच झाकून ठेवलय
तशाही भारतीय बायका झाकून ठेवण्यात वाकबगारच

कॅन्सरचे मूळ दिसत नाही पण कुळ दिसते

दुर्देवाने ते तिसऱ्या स्टेजमध्ये दिसल्याने
हा उपचारांचा खेळखंडोबा निर्माण झालाय

आपला डोळसपणा प्रकाशावर अवलंबून असतो
इतके आपण परावलंबी

वाढत्या पेशींचे नग्न जडत्व फार उशिरा कळले
आणि  आपण डार्क मॅटरवर घोंगडे अंथरून
उद्धाराची वाट पहात पडलो आहे

अंधारात मेणबत्ती शोधतानाही ठेचकाळणारे आपण
सूर्य शोधायला निघतो तेव्हा विनोदी दिसतो

काळ आपणाला हसतो आहे का ?



कॅन्सर बरा करायला आपणाला आणखी किती माहिती हवी आहे ?

रोज नवीन नवीन तज्ज्ञांना भेटून आपणाजवळ माहिती जमतीये
पण स्थितीत फरक पडत नाहीये

कॅन्सर आणि कावीळ
ह्या डेडली कॉम्बिनेशनचं काय करायचं हे कुणालाच कळत नाहीये

बोटांचा  भुगा झाला तरी तू हात टेकत नाहीस
आणि ह्या लढाईची खरी ताकद तुझे हात आहेत



कॅन्सर तुझी भाषा क्षीण करतो
आणि बोलण्यातल्या  तुझ्या चुका डबल होतात

कावीळ तुझ्या डोळ्यातील पोलाद पिवळे करते
आणि तुझ्या नजरेपुढचा रस्ता वेडावाकडा होतो

कॅन्सर तुला दिवे पेटवू देत नाही
आणि तुझे देव राजीनामा देऊन निघून जातायत

कॅन्सर तुझे चेहरे फाडून टाकतो
मुखवटे बनवणारी काळाची वाळू डान्स करत तुझ्यापुढे नाहीशी होतीये

१०

प्रिया,  भावोजी आणि मी मोबाईल दळून दळून
केमोथेरपीचा निर्णय घेतोय

ड्रगसचा शामियाना उभा करण्याचा हा खटाटोप
काय पदरात टाकणार कुणालाच माहीत नाही

उपचारांचा गच्चं ट्रॅफिक ओलांडणे अशक्यप्राय

मी तुझं शरीर फॉरेनहून मागवल्यासारखे
डॉक्टरांच्या ताब्यात देतोय
आणि निघतोय

माझ्यासमोर फक्त एक मॅप आहे
आणि त्या मॅपवर प्रवासी परतेल ह्याची गॅरंटी नाही


श्रीधर तिळवे नाईक


****************************************************************************





ऑडिशन् श्रीधर तिळवे नाईक



सर्वायवलचं युद्ध मागे सारत
मुंबईची प्रसन्न पहाट
सूर्याच्या हातांनी किरणांच्या रांगोळ्या घालतीये

अनंताचा डोंब उसळतोय सॉफ्ट हातांनी

आनंद खोबरेल तेल लावून सर्वच दिशांनी परततोय

सामान्य माणूस म्हणून जगण्याचा निर्णय घेतल्यावर
व्यवहार अटळ होतात

व्यासपीठ इरेज करत माझा खोडरबर सरकतोय



मी निर्मात्याला फोन करून सांगतोय
मी ठरल्याप्रमाणे  ऑडिशनला  पोहचतोय शार्प एक वाजता

आज पुन्हा एकदा शेकड्यात ९९ बळी जाणार आहेत
आणि एक काळ्या विवरावर मात करून यशात उगवणार आहे

दिग्दर्शकाला निवडीचं स्वातंत्र्य असतं ही एक अफवा आहे
आणि ह्या अफवेला बळी पडून स्ट्रगलर्स माझ्या पुढ्यात दाखल होणार आहेत

फिल्म इंडस्ट्रीत उठाव डिसलोकेट होतात
आणि क्रांत्या फॅशन वाळत घालतात

मी विद्यार्थ्यांना ऑडिशनची थोडी प्रॅक्टिस व्हावी
आणि मटका लागून सिलेक्शन झालं तर झालं म्हणून
ऑडिशनला येण्याचे मेसेज पाठवतोय

बस राम मंदिरापाशी थांबतीये
आणि हे राम पासून हरे राम पर्यंत
सर्व ऐकत
कनेक्ट झालेले अनंत काळजात वाजवत चाललोय



निसर्गाला ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसमध्ये थांबवून ठेवल्यासारखी झाडे
हे बरं आहे कि झाडांच्या फाईली बनत नाहीत

मी आंब्याला किस करून
घरात प्रवेश करतोय

हवेत शांती उमलतीये

मी स्वतःला कमर्शिअल बनवण्यासाठी
नव्या तारा जोडतोय



नेहमीप्रमाणे मी टायमावर
आणि सुसंगत

निर्माता वाटेवर
आणि प्रॉडक्शन मॅनेजर नेहमीप्रमाणे लेट

वेळ म्हणजे आयुष्य हे साधे समीकरण
अजूनही मूळ धरत नाही

एडी सीनच्या झेरॉक्स काढतोय
आणि कॅमेरामन कॅमेरा चेक करतोय

प्रिया मोबाईलवरून तुझ्या केमोथेरपीचा रिपोर्ट सांगतीये
तो पचवून मी ऑडिशनसाठी सुसज्ज होतोय

तिकडे तुझी बॉडी रिपेयर व्हावी म्हणून प्राणांतिक वेदना
आणि इथे सुदृढ मॉडेल्सचे सुंदर तांडे

आयुष्याचा मुख्य पिक्चर मृत्यू
आणि आपण सर्व फक्त ऑडिशन देत सुटलोय  का ?

एकजण अफलातून सर्वांग सापवत नाचतोय
दुसरी आयटम सॉन्ग सादर करत वातावरण सेक्सी करतीये
तिसरा भयाने फम्बल मारतोय
चौथा माझा विध्यार्थी क्षणभर गोंधळून मार्गी लागतोय

एकसाईटमेन्ट आणि सेक्साईटमेंटचे जोरदार वारं सुटलंय

हवाही फ्लर्ट करतीये फॅशनशी

मदमस्त टांगांच्या मधून रक्त पेटवणारा कैफ वहात सुटलाय

मी दिग्दर्शक म्हणून फक्त टॅलेंट हुंगतोय
आणि कागदावर सुवासिक नोंदी करतोय

मत्सर आणि स्पर्धांच्या दरम्यान मी विनोदी पंच मारत
ऑडिशनमधलं अध्यात्म शाबूत ठेवतोय

बाहेर न्यूकमर्सची प्रचंड गर्दी
आणि आत वेळेची मर्यादा

माणसाला एकटं करणारी महत्वाकांक्षा
बेफाम होतीये

माझ्याकडे दहा मिनिटं आहेत
आणि समोर दहा मुली आणि बारा मुलं मलूल चेहऱ्याने
आपल्या चान्सची वाट पाहतायत

मी निर्मात्याला सांगतोय
सातचे नऊ करुया
आणि निदान ज्यांना  आत दाखल करून घेतलंय
त्यांना चान्स देऊया

आता स्पर्धा अतितीव्र होतीये
आणि फुले प्लास्टिक विकायसाठी
एकमेकांशी भांडतायत



एकीकडे तुझ्या तब्येतीचे चौकशी करणारे कॉल
आणि दुसरीकडे माझीच निवड करा अशा ग्लॅमरस विनवण्या

कॅन्सर सगळे मेकअप उतरवतो
फिल्म चेहऱ्यालाही मेकअप बनवते
आणि मी ह्या दोघातून अनंतात चालतोय

आभाळात चंद्र उमललाय
पण तो अमावस्येकडे चाललाय कि पोर्णिमेकडे
हे माझ्या डोळ्यात पडलेल्या
त्याच्या प्रतिबिंबाला कळत नाहीये


श्रीधर तिळवे नाईक
*********************************************************************
वार्ता श्रीधर तिळवे नाईक



आसपास सगळं कसं जिवंत आणि रसरशीत

नेहमीच फ्रेश राहणारा हा नित्यनूतन साबण

कित्येक घोळातही माझी आंघोळ चालूच आहे




अनंताने कपडे धुता येत नाहीत
त्यासाठी सर्फ एरियल ५०१ सनलाइट लागतात



व्यवहारांच्या काठावर उभी असलेली मांजरे आणि गाढवे

दरम्यान माणसे ज्यांना देव बनायचं  आहे
पण साधना करायची नाहीये

अध्यात्म ही त्यांची करमणूक आहे
किंवा दारूसोबत चघळायचा चकणा


जगणं हे माझ्यासाठी फक्त वर्णन आहे
आणि मी वर्णनं करतोय



कवितेतून मी त्यांच्याशी बोलतोय
जे फेसबुकवर आहेत
पण ज्यांचे मांस माझ्या हाताशी लागत नाही


तुझ्या कॅन्सरमुळे ह्याक्षणी मी फेसबुकवरही स्तब्ध आहे

कवितेला अध्यात्माचं भाषांतर जमत नाही
म्हणूनच ती फक्त धार्मिक होते

फेसबुकवर मी तुझा कॅन्सर टाकत नाहीये
कारण तो फक्त धार्मिक होईल
ह्याची मला खात्री आहे




माझ्या होमचं थिएटर झालेलं नाहीये
त्यामुळे ऍक्टरही प्रवेश करतांना नागडे येतायंत

त्यांचे संघर्ष आणि एका चान्सची अपेक्षा
दोन्हींना खेळवत
ते बोलतायत

त्यांच्या चामड्याच्या बॅगा
पाणी भरून भरून थकलेल्या

सरफेस विकून चेहरा कमावणारे बॉलिवूड कायम सन्मायकासारखे

गरम आणि पात्र उष्णता भरभरून वाहतिये
उत्साहाने भरलेले हात दाहीदिशा वाहतायत

माझा कन्फेशनल बॉक्स झालाय

प्रत्येक ऍक्टरला रावणासारखे दहा चेहरे आहेत
आणि मला त्याचा फक्त एकच चेहरा वापरायचा आहे

एकाच वेळी करोडोंना  भेटता येते
ही पडद्याची ताकद आहे
आणि प्रत्येकालाच ती हवी आहे

त्यामुळेच आपले झवाडे आवाज उंचावत
गळे चालतायत अलंकारातून दागदागिन्यांतून

मी माझे कॅरॅक्टर प्रत्येकात टॅप करत चालतोय

निवडीच्या स्वातंत्र्याचा भडकपणा भडक पोशाखात उभा

आणि प्रियाचा कॉल

'' उजू ऑंटी icu त ----- तू जे आहे ते स्पष्ट सांग मला ''

कीर्ती शिंदेचा कॉल
''मला श्रीवाहिनी हवी आहे माणूस पाठवतोय ''

निर्मात्याचा कॉल
''सुनीलचं काय ते बघा ''


समोर ऍक्टर्स
कीर्तीचा माणूस

मी श्रीवाहिनीचे कागद शोधतोय
मी तुझे भविष्य शोधतोय
मी सुनीलची अभिनयक्षमता शोधतोय

मला बांधकाम चालू मिळते पण श्रीवाहिनी मिळत नाही
मला रक्ताचा फ्लॅश भेटतोय पण नेमकेपणा नाही
मला अभिनय दिसतोय पण मेन कॅरॅक्टर दिसत नाही

मी कीर्तीच्या माणसाला बांधकाम चालू आहे देतो
मी अभिनेत्याला मेन व्हिलन देतोय

आणि मग अचानक तुझा फ्लॅश
नाकातून वाहणारे रक्त
आणि मृतवत डोळे

मी प्रियाला फोनवर सांगतोय
'' ती गेलीये ''



कन्फर्मेशनची मेडिकल न्यूज येत नाहीये

""कविता अशी लिहावी
निदान स्वतःला कळावी ""

मी एका नवोदित कविला सांगतोय

कविता आणि रोगांची मेडिकल डिस्क्रिप्शन्स
एकसारखीच
दिसणाऱ्या ह्या काळात त्याला हे पटत नाहीये

कवी आणि डॉक्टर्स
दोघेही ट्रोल नाक्यावर उभे

वादांच्या सिंहगर्जना आणि स्कँडल्स

पेशंट मेला आहे कि नाही ?

लाखो वर्षे आपण मरतोय
पण आपणाला मृत्यूची व्याख्या करता येत नाहीये

तुला सहन करणे हे कायम अशक्य होते
मृत्यूनंतरही हे दृश्य बदलत नाहीये

बायजी युगानुयुगे घाबरलेली आहे
आपल्या बहिणीच्या नाकातून उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या
तिला शॉक देऊन गेलेत

भावोजी भयात स्तब्धतेचा  बर्फ चघळत


समोरचा अभिनेता सांगतोय
'' सर माझे सिलेक्शन करा ''

कीर्तीचा माणूस
प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या कविता  घेऊन
निघून चाललाय

कन्फर्मेशन होत नाहीये

आता मी मुंबईतून तू मेलीयेस अशी ऑर्डर द्यावी का ?

तू काविळीनं मेलीयेस कि कॅन्सरनं
मेडिकली तू नेमकी कशानं मेलीयेस ?

तुझा मृत्यू पिवळा कि काळा ?

कन्फर्मेशन होत नाहीये



तू एक सामान्य बाई होतीस
साधारण चेहऱ्याची असाधारण जिद्दीची
सरासरी प्रतिभेची आगळ्यावेगळ्या स्टायलीची
आनंद पेरत जाणाऱ्या आनंद शोधणाऱ्या प्रवाहाची

तुझा स्रोत काढून घेण्यात आलाय

मरणापूर्वीही
तुला आपण मरेन
असं वाटलं न्हवतं

तुझा शेवटचा टॉक '' बी पॉझिटिव्ह '' होता
म्हणूनच कदाचित तू कशानं मेलीयेस
हे निश्चित होत नाहीये

तू कोणत्याही क्षणी जिवंत होशील
असं सर्वांना वाटतंय

कावीळ आणि कॅन्सर अशी दोन्ही कारणे देऊन
तुला मृत घोषित करण्यात आलंय
आणि बायजी भावोजी
तुझ्या शरीरातून  बाहेर पडत
तुझं प्रेत हॉस्पिटलातून बाहेर काढतायत




शेवटाच्या जीभेवर औषधं असतात
पूर्णविरामांच्या केन्द्रात विष आणि वल्ली

जखमा सुगंधी करणारी फुले
मला अद्याप सापडलेली नाहीयेत

मृत्यूनंतरचा भयंकर काळ
तुझी मुंडकी ओवत सरकतोय

तू पाच बॉल्सवर सिक्सर्स मारून
शेवटच्या बॉलवर क्लीन बोल्ड झालीयेस

माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतायत

चैत्यन्याच्या बॉक्समधला मी सुका मेवा झालोय

मासा समुद्रात पोहून पोहून थकला
आणि बुडाला

मृत्यू ज्या भाषेत बोलतो
त्याच भाषेत तर मी आयुष्यभर बोलत राहिलो
तरीही तुझ्या मृत्यूची ही अघोरी भाषा
मला अपरिचित का वाटावी ?

'' वेळेअभावी आपण राक्षसांना मारत नाही राजू
आणि मग राक्षस इतके वाढतात
कि ते मारायला वेळ पुरत नाही ''

तू म्हणायचीस आणि आता तू मरून पडलीयेस

तू पुरेशी फॅशनेबल न्हवतीस
म्हणूनच मृत्यूवेळेस तुझ्या अंगावर साधे कपडे होते

त्यावरील यमराजाची एम्ब्रॉयडरी अद्याप ताजीतवानी  आहे

मी रडत नाहीये
मी साधेपणाला पाण्याने श्रद्धांजली वाहतोय

तू मेलेली नाहीस
तू कपडे काढून फक्त
नग्नतेकडे चालती झालीयेस

प्रिया विचारतीये
तू कधी निघतोयस
आणि मी कपडे चढवायला सुरवात करतोय -कपडे

श्रीधर तिळवे नाईक
(आत्ताच्या कविता ह्या फाईलीमधून )

***********************************************************************

अंतिम दर्शन  श्रीधर तिळवे नाईक



माणसाचं अंतिम दर्शन कोणतं
जिवंत असताना शेवटचं घेतलेलं ?
कि
मेल्यानंतर शेवटचं पाहिलेलं ?



माणूस मेल्यानंतर चिंतेचे काव्यशास्त्र संपते ?
कि तू मेल्यानंतर
काव्यशास्त्र संपून
सांत्वन नावाचा विनोद सुरु झालाय ?



मांस रेंगाळत रेंगाळत जाते
आणि त्याला आपण जगणे म्हणतो

तुझ्या मांसाचे   रेंगाळणे कायमचे थांबले
इतकाच मृत्यूचा अर्थ ?




आपण मृत्यूचे पारंपारिक बळी आहोत




गृहीताला मर्यादा नसते
तुझा मृत्यू गृहीत धरूनही
त्याचे गृहीतक मांडता आले नाही
आणि अचानक तुझा कारभार
आटोपलाय
कार क्रॅश झालीये
भार हलका झालाय



मी जगेन हा तुझा निर्धार पोकळ न्हवता
पण मृत्यूला तो पुरेसा वाटला नाही



मी निघतोय
मान्सूनचा पट्टा अनबकल करत

रिक्षा एपिसोडिक प्रवास करत गोरेगाव इस्टला दाखल झालीये

मी जखमी हातांनी कविता लिहितोय
आणि अनंत जखमा भरून नवा कोरा कागद देतंय

कागदावर रॅडिएट होणारा तुझा चेहरा
मेल्यासारखा वाटत नाही
उलट नवं आयुष्य जगायला गेल्यासारखा दिसतोय



बसला भरपूर वेळ आहे
आणि माझ्या एडीला आईस्क्रीम खाण्याची उबळ आलीये

जीलैटो इटॅलिनोचे बेंच पकडून आम्ही आईस्क्रिम खातोय
एक डोळा घडयाळावर आणि दुसरा चवीवर ठेवून

तू घड्याळाबाहेर निघून गेलीयेस
आणि त्याचे दुःख आणि आईस्क्रिमची चव
एकत्रच रेंगाळतायत

डोळा बर्फाने गच्चं झालाय
आणि मी अश्रूंची प्रतिक्षा करणे सोडून दिलंय



मावळणारे सूर्य चिमटीत सापडत नाहीत
आणि उगवणारे ओंजळीत

मी लायटीत हात उलटपुलटा पाहतोय

एडी दुःखातून स्वतःला विथड्रॉ करून निघून गेलाय

फॉरेन लगबगीत माणसे सरकतायत

मॉल म्हणजे सीन्सचे आगार
कितीही काढा नवीन तयार

मी ट्रॅव्हलिंग बॅगांचे डोअर  शॉपिंग करतोय
पण का कुणास ठाऊक मला नवीन बॅग घ्यावीशी वाटत नाहीये
आणि डोअर विंडोत बदलतोय

लाकडांची बदकं पाण्यात तरंगतायत
आणि मुलांना खेचतायत

सेल्फी काढत सेल्फबाज सरकतायत
आणि मी मोबाईलमधील तुझे फोटो आणि कॉल्स
सर्फ करून
त्यांना संघटित करतोय

१०

दोन आंधळे गॉगल दळतायत
आणि दृश्यांचे अदमास खात रस्ता क्रॉस करतायत

एक मुलगी दोन टेडी बिअर काखेत मारून गाडीत बसतिये

निळ्या डोळ्याचा फॉरेनर दृष्टी ड्रिफ्ट करत फ्लोट होतोय

एक साऊथ इंडियन मला कन्नड भाषेत बोलून तिकीट देतोय


आणि अचानक भर हायवेवर एक बैलगाडी येतीये
आणि मी लिफ्ट मागून त्यात बसतोय

बस हबजवळील पेट्रोल पंपापाशी थांबणार म्हणून


११

एक ट्रॅव्हलिंग अत्याचार करणारी प्रतीक्षा

शेजारील सिग्रेटीच्या धुरात तुझ्या मृत्यूचा धुरळा उडतोय

एक मुलगी फ्रेंच पुस्तक वाचतिये आणि तिच्या चेहऱ्यावर भाषिक शांतता

शवयात्रेचा प्रवास सुरु झालाय का ?

गोवा म्हणजे त्यांच्यासाठी फन माझ्यासाठी कफन

मी दिलेल्या कॉन्टॅक्ट्वर गाडी कधी येणार म्हणून विचारतोय

साहेब पांच मिनिटात हे नेहमीचं उत्तर येतंय

आणि बस सिरीयस चेहरा करून येतीये
जणू मला रुदालीत बसवलं जाणार आहे

१२

आणीबाणीमुळे मिळालेल्या एका फाटक्या स्लीपर कोचवर
मी जीव दाखल करतोय

शिव सोबत सर्वत्र बसमध्येही

अचानक त्याचा वसंत बस उमलवतोय

प्रत्येक प्रवाश्यावर प्रकाशाचे तरंग

निर्वाणाचे ऑडिट करता येत नाही
कारण त्यात सर्वस्वाचं दिवाळं निघालेलं असतं

भूषण मोबाईलवर विचारतोय

दादा प्रेत घरात दाखल झालंय
तू कधी पोहचतोयस ?

सकाळी !


१३

नॉर्मल माणसांना  नोमॅडिक बनवत बस सरकतीये

निंम्फो आणि मुक्त ह्यांच्यात फरक नसतो
दोघेही ओव्हररेटेड असतात

पोर्नो आणि प्रवचने ह्यांच्यात फरक नसतो
दोघेही सारखेच सिडक्टिव्ह असतात

मी स्वतःच्या शरीरात झोपतोय


१४

सकाळी जागा झाल्यावर खिडकीतून जंगल  दिसतंय

अजून जंगल  ?

कुठं पोहचलोय

संगमेश्वर ! ड्रायवर वाट चुकलाय साहेब !अंधारात काही कळलं नाही आणि

सुरेलचा फोन काका कुठाय
संगमेश्वर
काय

भूषण तासातासाला कॉल करतोय
आणि मी गावागावाची नामावली वाचत अधांतरी

तुझं  प्रेत फुगत चाललंय
आणि हा प्रवास
संपता संपत नाहीये


१५

''दादा गावकऱ्यांचं प्रेशर वाढत चाललंय
आणि प्रेताला वास मारणार अशी चिन्हे दिसतायत ''

'' काका प्रेत आधिकच फुगलंय ''

''राजा कुठं आहेस
जंगलात कुठं कलमडलायस ?''

'' तू नक्की येतोयस ना ? तुझा काही नेम नाही
तू बहिणीच्या आठवणीत तिचं प्रेत पाहण्याऐवजी
जंगलसुद्धा पाहायला जाशील ''

कॉल्सवर कॉल्स

बसचा मिसकॉल लागलाय
आणि अख्खा प्रवास भरकटलाय

''दादा परिस्थिती हाताबाहेर चाललीये
लोकांना किती ताटकळत ठेवणार
प्रेत फुगत राहिले तर ताठी उचलणं अवघड जाणार
असं सगळी म्हणतायत ''

मी ध्यान लावून बसतोय
तुझ्या प्रेताचा गावभर पसरलेला वास
कि माझे हुकणारे दर्शन

मला निवड करावी लागतीये

'' ठीक आहे तुम्ही मिळून निर्णय घ्या ''

ज्या समाजाला तू फाट्यावर मारलस
त्याच समाजाने शेवटी तुझ्याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा ?
सुगंधाची आवड असलेली तू
तुला शेवटी असा वास प्राप्त व्हावा ?


१६

तुझ्यावरच्या कविताही समाजात दाखल करायला
ठाम नकार देणारी तू
तिकडे स्मशानात जळत असशील

देहदान करण्याचा तुझा निर्णय
सारेच अवयव खराब झाल्याने
शेवटी सत्यात उतरू शकला नाही
आणि आता ही अशी स्थिती
जिला परवड म्हणावे कि नाही
तेही मला कळत नाहीये

समाजाच्या बण्डलबाजीविषयी कैकदा आपण चर्चा केलेत

तुझा मृत्यूही शेवटी ह्या बंडलबाजीत विलीन झाला काय ?

तुला सुखाचा चेहराही पाहू न देणारा हा  समाज
तुझ्या आनंदी असण्याने कायम विचलित झाला
आणि आता तुझा हा असा शेवटचा सोहळा


मी दुःखी नाही
पण शेवट्पर्यंत तुझ्या दुःखाचं मला काहीच करता आलं नाही
हेही सत्य

विदारकता हा आयुष्याचा स्वभाव आहे
आणि मी विदुर हातांनी तुला अदृश्य भडाग्नी देतोय

१७

पहाटेचे विधी चुकलेत म्हणून
भर दुपारी गाडी मध्येच थांबवण्यात आलीये

जंगलात विधी करायला प्रवाश्यांना लाज वाटली असती
हे ड्रायवरचे गृहीतक त्याला कसे सुचलं असेल

ड्रायव्हर माणसाने इतकं शहरी का व्हावे ?

हा प्रवास सुरवातीपासूनच युटोपियातून चालला होता
आणि जंगलात विलीन होऊन जमिनीवर आला

मला संडासला जायाचं आहे
आणि माझ्यासाठी पाणीच शिल्लक नाही

मी टांकीतून पाणी गोळा करत संडासात दाखल झालोय

निसर्ग निसर्गाच्या वेगानं काम करतोय
आणि शरीर निसर्गात ट्रान्ससेन्ड होत मोकळं होतंय

मी बाहेर येतोय
तर बस मला मागे एकट्याला सोडून फरार

मी तुझ्यापर्यंत पोहचूच नये असा काही घाट घातल्यासारखा बनाव

मी कॉल करायला जातोय तर नेटवर्क गायब

मला कॉल न करताच गाडी पुढे कशी गेली ?

मी हायवेवर येऊन कधी अंगठ्याने
कधी पांच बोटांनी लिफ्ट मागतोय
पण एकही गाडी थांबत नाहीये

मुंबईत बैलगाडी थांबवणारा माझा हात
इथे फ्लॉप ?

कि लिफ्ट मागणाऱ्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीनी
माणसावरचा उडवलेला विश्वास ?

मी रस्त्याचे इंटेरियर फॉलो करत
झाडांवर फिदा होत
चालतोय कॉल लावतोय
चालतोय कॉल लावतोय

कुणीही कॉल उचलत नाहीये

तुझं प्रेत आता जळून गेलं असेल का

तुझी कवटी आता फुटून गेली असेल का

मेसेज येत नाहीयेत
आणि मी मोबाईल सांभाळत चालतो आहे
आणि अचानक कॉल लागतो

भूषण कॉलवर सांगतोय
''प्रेत जाळून घरी परतलोय
पण प्रेत जळाले तू दारात पोहचलेला नाहीस
माझी आंघोळही झाली  ''

तुझी राख झालीये
मला कुणी लिफ्टही देत नाहीये

१८

विनाशाची पॅरोडी झालीये
शांतता मोजत पाय चाललेत
एक दारुडा मोदी मोदी म्हणत झोकांडतोय

वाहनांना माझी काहीच पडलेली नाहीये
ती अनोळखी चेहरा करून येतायत
आणि भसाडा आवाज करून जातायत

थोरल्याला माहितीये धाकटा बहिणीला जाळून घरात आहे
धाकट्याला माहित नाही थोरला कुठं आहे ?

ढगाची थेट सावली माझ्यावर पडलीये
मृत्यूच्या गरमीने अंगावर घामोळे येतायत

एक हिरवा टेम्पो येतोय
आणि थेम्ब थेम्ब करत थांबतोय

डबल भाड्याच्या अटीवर मी निघालोय

१९

मृत्यूचा स्पेशल ऑकेजन होण्याइतपत तू प्रसिद्ध नाहीये

त्यामुळेच तुझ्या मृत्यूचे स्पेशल टेलिकास्ट नाही

मी फक्त इमॅजिन करू शकतो मोबाईलवर मिळणाऱ्या वर्णनाच्या आधारे

सेलिब्रिटी नसण्याचा हा तोटा कि फायदा ?

सामान्य लोकांचे मृत्यू  मीडियाच्या तावडीतून निसटतात
हे बरंच
त्यामुळे सामान्य माणूस प्रत्येक नातेवाईकांसाठी
वेगवेगळा मरतो

तू जशी बायजी भावोजींसाठी मेलेली आहेस
तशी भूषणसाठी मेलेली आहेस का

व्यक्तिगणिक तुझ्या मृत्यूचा व्हर्जन वेगळा

माझ्याजवळ तुझ्या मृत्यूचा फक्त माझा व्हर्जन तयार होतो आहे
ज्यात मी तुझ्या चितेपर्यंत पोहचू शकत नाहीये

ढेरपोट्या  पाऊस पडतोय
मातीच्या सुगंधाचे घेवडा मिस्चर नाकाची भूक भागवत पसरतंय

अबोली टवटवीतपणाचे चेक साइन करतीये
जे माझ्या डोळ्यात कॅश होतायत

मी टेम्पोत  बसून चाललोय  अनंताच्या पावसातून

टेम्पो थांबलाय टेम्पोवालाच्या दारात

''साहेब इथून रिक्षा भेटेल अनमोडपर्यंत जा तिथून बस पकडा ''

२०

अचानक चैतन्य उसळतंय चैतन्यमुखी चेहऱ्याने

टेम्पोवाल्याला त्याचा टच झालाय

तो वळतोय

'' साहेब तुम्ही कोण आहात ?''

मी उत्तर देत नाही

'' मी रिक्षावाला घेऊन येतो तुम्ही इथं बसा ''

मी कॉफीची ऑर्डर देऊन बसतोय

टेम्पोवाला आकांताने माझ्यासाठी लिफ्ट मागतोय ''

माझी कॉफी संपतीये

'' साहेब मी रिक्षेवाल्याला घेऊन येतो ''

तो बाईक काढून रिक्षेवाल्या मित्राकडे

हायवे तकाकतोय काळ्या अंगकांतीत
आणि त्वचेवर गाड्या पेलतोय

मेघमधुर आभाळाच्या सरी मेघमल्हार गातायत
मंद्र सप्तकात

टपरीवर बायकांची उपस्थिती टपरीला बायकी करतीये
आणि नाजूक आवाजात विचारणा
'' सर जेवलाय का ''

मी काहीच बोलत नाही
फक्त डोळे मिटतो

बायका सगळंच टची करतात
टपरी अपवाद नाही

झाडांमधून भिरभिरणारा वारा अचानक दारू पिल्यासारखा वांड

माती तालेवार होत उडतीये

टेम्पोवाला रिक्षावाल्याला घेऊन आलाय

'' साहेब बसा एसटी स्टेशनला सोड सायबांना ''
'' हो ''

मी डबल भाडं आणि एक्स्ट्रा १०० रुपये देऊन रिक्षात बसतोय

''बाय साहेब ''
'' बाय आणि धन्यवाद  ''

त्याच्या चेहऱ्यावर चंद्र पसरतोय

मी पौर्णिमा सोडून पुढे सरकतोय

२१

एकट्या रिक्षातून एकटा प्रवासी एकट्या ड्रायवरबरोबर

ड्रायवर मुंबई गोवा हायवेच्या गमतीजमती सांगतोय
आणि वाटेवर एक म्हातारी रिक्षाची वाट पहात रस्त्यात ओथंबलेली

शिसवी सुरकुत्यांचे जंगल
आणि विक्रय मालाची ढोली अंगाखांद्यावर

जिथे मलाच मिळाली नाही तिथे हिला रिक्षा कुठून मिळणार
म्हणून मी रिक्षा थांबवायला सांगतोय
ड्रायवरची कर्कश कुरकुर
साहेब अर्ध भाडं बुडवतात वैग्रे
म्हातारीचं भाडं मीच देईन म्हंटल्यावर रिक्षा अबाऊट टर्न घेऊन म्हातारीपुढं

म्हातारी आणि तिची कुटुंबकथा सावकाश बोगदे पार करत सरकतीये
त्यातील अंधार तिच्या डोळ्यात साकळलेला
आणि शेवटी सह्याद्रीएव्हढा अश्रू

माणसे दुःखी आहेत
आणि माणसांना बुद्ध व्हायचं नाहीये

म्हातारी चक्क थँक्स म्हणत उतरतीये

तृष्णांत गुंतलेल्या सुरकुत्यांचा गुंतवळा पाठमोरा होतोय

तिच्या डोक्यातल्या मेंदूचा प्रेशर कुकूर
पहिली शिट्टीही वाजवत नाहीये
फक्त शीतं आणि भूतं सतत उकडणारी

शरीरातल्या शरीरात उकडून मरणे
मी नाकारले
आणि कुकरमुक्त झालो

रिक्षा चाललीये
आणि हायवे रिप्लेस होऊन किस्से म्हाताऱ्यांचे ऑन


२२

मी रिक्षातून बसकडे हनुमानजम्प घेऊन चाललोय

दैवी बँकेतून ग्रेस गळतीये
अनंताची अनहद शीळ आसमंत वाजवत

संगीत हे एकमेव मिशन असल्यासारखी बस आवाज करत चाललीये

चुका गुन्हे आणि पापे ह्यांचा भार
डोक्यावर असल्यासारखी माणसं
बसला तुरुंग बनवत बोलतायत

पुन्हा फोन ''कुठे आहेस ''

नातेवाईक तुझा मृत्यू फोनवरून धाडतायत
आणि मी अनंतात बसून त्यांना रिप्लाय देतोय

२३

मी फोंड्यात अवतीर्ण झालोय
आणि बस फरार झाल्याने बॅग नसलेला मी
रिक्षा पकडण्यापासून मुक्त झालोय

मी स्मशानभूमीत जाण्यासाठी
पायलट शोधतोय

एरव्ही झुंडीने अंगावर येणारे पायलट नेमके आज गायब

हवेतील  पावसाळा
आणि पायलटचा दुष्काळ पेलत मी रिक्षावाल्यांना विनंती करतोय
पण स्मशानाकडे यायला कुणीही तयार नाही

मी वैंकुंठभुमी दहनभूमी असे शब्दही वापरून पाहतोय
पण कुणालाही तुझ्या मृत्यूकडे फिरकायचं नाहीये

शेवटी नाईलाजाने मी आपल्या मंदिराचा ऍड्रेस सांगतोय

देवांना मान देणारी
आणि मृत्यूकडे पाठ फिरवणारी ही संस्कृती आहे का ?
कि माणसाची ही सहज मानसिकता आहे ?

अचानक मी म्हणतोय
'' पुढे उजव्या टर्नवर स्मशानभूमी ''

रिक्षावाला जराही कुरकुर न करता  उजवा टर्न  घेतोय

मी झपाट्याने स्मशानभूमीत शिरतोय

दोन चिता
एक ताजी एक शिळी
तुझी कोणती
ताजी !

मी ताज्या राखेकडे वळतोय

राखाडी जमावडा हीच शिल्लक ?

शांतता आणि अनंतता
माझ्या अश्रूत एकवतायत

आसपासच्या डोंगरातून फक्त उंदीर निघाल्यासारखी ही दहनभूमी
आणि तुझी ताजी राखाडी

राखाडीत कुठेही कॅन्सर नाही कावीळ नाही

चीतेत मृत्यूची सगळी कारणं संपतात ?

मी तुझी चिमूटभर राख कपाळाला लावतोय
आणि भस्मीभूत होतोय

हेच तुझे शेवटचे दर्शन
कि
मी मरणार नाही
अशी  हॉस्पिटलमधली  तुझी  जिवंत निर्धारी पॉझिटिव मुद्रा ही अंतिम ?

आपण सगळेच अनंततोंडी मांजराच्या एका तोंडातले  उंदीर आहोत
फक्त तुला खेळवून खेळवून रिचवलं गेलं एव्हढंच

मी हाताला चिकटलेली तुझी राख झाडतोय

अलविदा सिस्टर ! बहीणाबाई घ्या तुमच्या भावाचा अखेरचा मुजरा !
त्या क्षणांसाठी ज्यांनी मला आनंदाची कालातितची वाट दाखवली
आणि शेअरही केली .


श्रीधर तिळवे नाईक 


(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

***********************************************************************

सांत्वनाची  कविता  श्रीधर तिळवे


भूगोल म्हणजे टाकलेला इतिहास
आणि त्याचा जिवंत  रसरशीतपणा

मृत्यू म्हणजे भूगोल नाहीसा होणे

तुझी बॉडी तुझा भूगोल होती
आणि
आता ती नाहीशी झालीये

उरलेला इतिहास
आम्हाला इतिहास संशोधक बनवतोय

तू अशी होतीस तू तशी होतीस

वस्तुस्थिती एकच
तू नाहीयेस


परीक्षा घ्यायला मला कधीचं आवडलं नाही
मला सगळ कसं  सहज उमलल्यासारखं हवं होतं

परीक्षा द्यायला तुलाही कधी आवडलं नाही
तुला सगळ कसं सहज आल्यासारखं हवं होतं

पण सहज तर
आपल्या वाट्याला
खरीखुर्री फळंही आली नाहीत
आणि
दिवस तर नेहमीच परीक्षेसारखे उभे ठाकले

आज
प्रश्नपत्रिका विंडोतून फेकून द्यायच्या ऐवजी
तू स्वतःच विंडोतून उडी घेऊन
नाहीशी झालीयेस
आणि तुझ्यानंतर वाढलेल्या प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा पहात
अवघे घर नापास झालंय

आपण भारतीय
जबाबदाऱ्या आणि कर्तव्याच्यांकडे
आयुष्य गहाण टाकतो
आणि जगतो

आपण कायम दास अवस्थेत
पाश बनवणाऱ्या व्यवस्थेत

आपण सतत शूद्र असल्याचे फिलिंग घेत
आणि शूद्र म्हणून इतरांशी डीलिंग करत

तू अपवाद नव्हतीस
म्हणून तू
आयुष्यातल्या  आयुष्यात वारलीस


मी बुद्धत्व जाहीर करत नाही 
कारण आधीचे संत फेक होतील 
असं तुला वाटायचं

प्रत्यक्षात मी त्याला सूक्ष्मदर्शकाखाली ठेवत अनंतभर 

त्यावरून तुझा वाद 

मी शब्दाबाहेर जाऊन कान उघडे ठेवून  

आश्रम काढायच्या करोडो रुपयांच्या ऑफर्स ठोकरून 
मी एकटाच बसलेलो 
आणि मी असा बसलोय म्हणून तू गोंधळलेली 

चैतन्याच्या अनेक रात्री तू शेअर केल्यास 
पण तुझा मृत्यू मी शेअर करू शकत नाही 

स्वदेह ही कंपनी एकट्याची आहे 
आणि ह्याचे शेअर किंवा ओवनरशिप दुसऱ्या कुणाला विकता येत नाही 

आता तुझ्या कम्पनीचं दिवाळं निघालंय 
आणि ह्या दिवाळ्याचे काय करायचं हे कळल्याने 
लोक सांत्वन देतायत 






लोक एकवेळ मृत्यू सहज स्वीकारतील 
पुनर्जन्म स्वीकारणे महाकठीण 

जगात फक्त दोनच गोष्टी सत्य आहेत 
पुनर्जन्म आणि मोक्ष 
आणि लोकांचा दोघांवरही विश्वास नाही 

लोक विश्वासाचं नाटक करतात 
आणि पुन्हा मूळ अभिनयात शिरतात 

श्रद्धा हा माणसाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे 
आणि सर्वच अभिनय 
श्रद्धेच्या मणक्याधारे मेंदू बनवतात 

तू कधीच अभिनेत्री झाली नाहीस 
म्हणूनच तुझा पिच्चर फ्लॉप झाला 

आणि आता तर तुझी 
मूळ प्रिंटही जळून गेलीये 


लोकांना किमान तुझ्या मृत्यूत तरी
मी पारंपारिक हवा आहे
आणि मी तसा होत नाहीये
म्हणून त्यांच्या डोळ्यात अस्वस्थता आहे


जिनिअस असण्याची बाधा मला कधीच झाली नाही
पण ओरिजनल असण्याचा अहंकार मी तांडव करत मिरवला

शेवटी मुक्तीने त्याची माती केली

माझा आनंद अव्याहत आहे
फक्त मी त्याखाली सामाजिक  सही करत नाहीये



कवितांची रचीतं आतला आवाज मानण्याचे दिवस संपले
आणि साधनेच्या कठोर रात्री सुरु झाल्या

सोबत तुझा आईचा बायजींचा अप्रत्यक्ष आवाज होता

मी सिमेंटने घराच्या खिडक्या बंद केल्या
तेव्हा अनंताने मांसल दरवाजे उघडायला सुरवात केली

आता तुझे मांसल मरून गेलंय
आणि आठवणी छत्र्या उघडत पावसात उभ्या


अणुस्फोटासारखा तुझ्या मृत्यूचा बलून तरंगतोय आभाळात
आणि सांत्वने त्याचा पतंग बनवून
माझ्यासमोर उडवतायत

तुझ्या नाकातून उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीचे
बायजीसमोर लाल मासे बनलेत
आणि ते उडतायत तिच्या डोळ्यासमोर

तुझ्या आठवणींचं प्लास्टिक
वर्तमानाचे सारे धातू नष्ट करतंय

माझा मोबाईल तुला आवडणाऱ्या चंद्रावर जाऊन
तुझ्या मृत्यूचा झेंडा लावून आलाय

सांत्वने ऐकून ऐकून माझ्या कानातून स्प्रिंगा बाहेर येतायत
आणि शेजारी संजय लीला भन्साळीचा पिंगा ऑन

किंचाळ्याना मी बाहुबलीच्या आयटम सॉन्गच्या साड्या नेसवू काय ?



तुझं अपर नाक सतत एक शार्क घेऊन येतं आणि शिंकतं

टीव्हीपुढे तुला आवडणारे सोप ऑपेरे बडीशेप वाटतायत

सालवोडेर दालीची तू लपवलेली अजरामर घड्याळे
आत्महत्या करून
झुरळासारखी उघड्यावर येतायत

तू मृत्यू नावाच्या उंटांचा मुका घेऊन
वाळवंटात विलीन झालीयेस
आणि कुटुंबापुढे जीवन नावाचा अरब तंबू घेऊन उभा

त्याचा नवा उंट काय आहे ?



१०

मोनालिसा लॉग इन झाली तर काय होईल

सनी लिऑन ?

मार्केटिंगच्या मुंग्यांनी सूर्य गिळला तर त्यातून काय बाहेर पडेल

ant -man

सात प्रेग्नन्ट बायका आदिवासी डान्स करतील तर त्यांच्या स्टेपमधून काय उगवेल

ब्रह्मकमळं

माझे प्रश्न तुझी उत्तरे तुझे प्रश्न माझी उत्तरे

सत्य जर मुक्त करतं
तर तुझा मृत्यू कुणालाच मुक्त का करत नाहीये ?


११

ह्या घरातील आशावहिनीची लगबग

ह्या बाईच्या आयुष्यात किती बोल्ट आले स्क्रू आले
पण हिने कधी घराचा कारखाना होऊ दिला नाही

तुझ्यासाठी वाहणारे तिचे जेनुइन अश्रू
मला तुझ्या मृत्यूची खात्री पटवतात

तू म्हणायचीस
वहिनी आपल्या प्रेमळ स्वभावाने डोंगरसुद्धा उपसेल
आणि कष्टांनी समुद्रसुद्धा भांड्यात जमा करून
त्याचे पिण्याचे पाणी बनवेल

तिचा म्युझिकल पदर दुःखाची गिटार वाजवतोय
आणि तुझा मृत्यू टिपेला न्हेतोय

मी तिला सांत्वन देत नाही

फक्त सांत्वन हे शेवटचे वन असल्यासारखा
तिचे दुःखी डोळे पहात बसतोय

१३

काळ्या पट्ट्या चालून येतायत

त्यांच्या डोळ्यात तुझे फोटो
आणि त्यांना उचलणारा चिमटा

काळ्या पट्ट्यातून वाहणारा काळा रंग घरभर होतोय
आणि तुझ्या मृत्यूचे चेहरे तयार करतोय

त्यातील रुरल कुठला आणि अर्बन कुठला ?
तू गावात आल्याने मेलीस कि शहरात गेल्याने मेलीस ?

भगव्या रंगाला मी सगळे संस्कार निदान ह्यावेळी तरी
करू देतोय कि नाही ह्याची चिंता

पट्ट्या चालून येतायत
मृत्यू कुणाचेच डोळे उघडत नाही


१४

काळजातील बर्फावर उभे असणारे अश्रू
तळं तयार करतायत

त्याच्यातील पाण्यापासून तयार झालेल्या खुर्च्यांवर पाहुणे बसतायत

डोळ्यांना अवयवांच्या जागी फक्त रेघा दिसतायत

तू आखून दिलेल्या लक्ष्मणरेखेचा अस्त झालाय
आणि मुंग्या सांत्वनात एकामागून एक  क्रमवार सरकतायत

१५

मला माहीत नाही
दुःखं सांत्वनाचं काय करतात ?

एकाच फ्रेममध्ये तुझे असंख्य फोटो टांगलेले

डायनिंग टेबलवर तुझ्या फक्त बांगड्या विदाउट किणकिण

खुर्चीत तू अर्धवट वाचलेल्या पुस्तकाचा सांगाडा

मोबाइलमधले तुझ्याशिवाय डेड झालेले स्टोरेज

बंद टीव्हीतून वाहून गेलेले तू पाहिलेले एपिसोडस

ह्यातलं सांत्वनामुळे काय बदलणाराय ?


श्रीधर तिळवे नाईक 


(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

************************************************************************************************************************



























 ***

राखेची  कविता श्रीधर तिळवे नाईक 


तू जाऊन चार दिवस झालेत 
आणि आज पंचमहाभूतं परंपरेचा पोस्टमॉडर्न चेहरा घेऊन दारात उभी 

धार्मिक संहिताच्या प्रभावाचा चाबूक माझ्या आसपास तयार 
आणि माझा विधी करायला सपशेल नकार 

माझा नकार गृहीत धरूनच 
भूषण आणि सुरेल काम करतायत 

भाऊ गेले तेव्हाचा संघर्ष आता अवतार घेत नाहीये 

भूषणचा पारंपारिक झेंडा परंपरेला ठाऊक झालाय 
आणि ती मोठ्या भावाचे अधिकार छोट्या भावाला देत 

लवचिकपणे स्वतःला ऑपरेट करतीये 


जिझसभवती अकरा सेलिब्रिटीज बसल्यासारखा हॉल 
माणसांनी भरलेला 

मावस बहिणींच्या डोळ्यातील  शोकात्म पऱ्यांचे बूट आखूड झालेत 
त्यांना मी तुझी राख गोळा करायला जाणार आहे का 
हा प्रश्न पडलाय 

निळ्या रंगाच्या शिड्या चढत जांभई छताला लटकतीये 
पोस्टमॉडर्न पासवर्ड पास होण्याचे दिवस संपलेत 
हे न कळालेला माझा भाऊ भटजीला देशीवादी कॉल देतोय 

मी फेसबुकवरच्या तुला वाहिलेल्या डिजिटल श्रद्धांजल्या सर्फ करतोय 
ह्या सर्वांचा तुझ्याशी संबंध काय ?
त्यांच्या नेटनेमक्या शब्दांचे काय करायचे ?

फेसबुक हा निळ्या रंगाचा ढग आहे 
जो सर्वत्र माणसांच्या मेंदूत पाऊस पाडतो 
पण स्वतः भिजत नाही 

गॉगल बदलून कधी मोतीबिंदू दुरुस्त होतो का ?
मी फेसबुकला प्रश्न विचारत नाही 

मृत्यू माणसाचे अपंगत्व ठामपणे अधोरेखित करतो 
त्याला दिव्यांगत्व बहाल करून ढिले करते येईल का ?

परंपरा फक्त भाषिक बदल करत असते 
आणि सत्याला नवे पॅकिंग  लावत असते 

तुझ्या मृत्यूला नवे पॅकिंग लावले जातंय 
आणि मी ट्विटरकडे सरकत 

लोकांना कशाहीवर विश्वास ठेवायला पारंगत केलं जातंय 
म्हणून मीही रांगत रांगत पारंगत होऊ ?

मी विधीला नकार देतोय 
आणि भूषणच्या खांद्यावरचा घोटाळा पहात 
तू नुकतेच लावलेले चाफ्याचे रोपटे पहात 
पोस्ट्सची पापडी  खातोय 



तुझी राख आणि लिम्का   ह्यांच्यात फरक काय ?

तुझी राख आणि रद्द झालेल्या नोटा ह्यांच्यात फरक काय ?

तुझी राख आणि कम्युनिझमचा अस्त ह्यांच्यात अंतर किती ?

तुझा घाम तर वाळून गेला 
आणि तुझ्या वॉलपेपरवर उरलाय सोन्याचा मोर 
आणि त्याचा स्काय ब्लू पिसारा 

तुझ्याबरोबर तो जळणार आहे का ?



बिल्डिंगा जहाजसारख्या बांधल्या म्हणून 
समुद्र काळजात राहायला येणार आहे काय ?

डिजिटल डायनॉसॉर्स रिऍलीटीत वाटले म्हणून 
ते पुन्हा परतणार आहेत काय ?

मंत्रांनी तुम्ही मला धड मुतायलाही भाग पाडू शकत नाही 
मग त्यांनी  काल्पनिक धबधबा निर्माण केला म्हणून 
मी साईटसीईंग करू  ?

मी भटजीला एसकेप करत 
टचने व्हाट्स अप उपसतोय  



सुरेल कार घेऊन आलाय 

त्याच्या काळजातला फाईट क्लब 
आपतर्फे निवडणूक हरुनही बंद पडलेला नाही 

त्याच्या डोळ्यात ज्वालामुखीचे शांत मॅट्रिक्स 
आणि असंख्य फुलपाखरे 

सर्पमित्र होत सापापासून 
हा आपला पुतण्या आपपर्यंत कधी पोहचला 
ते आपल्यालाही कळलं  नाही 

त्याचा हळवेपणा झाकून ठेवत वावरणारा चेहरा 
हताशतेचं फावडं उचलत 

आम्हाला तुझी राख गोळा करायची आहे 
आणि भूषण परंपरेचा अभ्यासक्रम न वाचताच 
परीक्षेत पास होण्याची खात्री बाळगत 
भटजीला काखेत मारत कारमध्ये बसतोय

 ६

मृत्यूनंतर अवयव दान करता येणार नसतील तर पुढे काय 
ह्याचे कसलेही न केलेले डॉक्युमेंटेशन 

आणि मी न पोहचल्याने 
आणि विद्यतदाहिनी शक्य नसल्याने 
तुझी झालेली राख 

मेलेल्या माणसाची राख जमिनीत गाडावी 
कि जमिनीवर पसरावी 
कि पाण्यात सोडावी ?

मेल्यानंतर मेलेल्या माणसाला ह्याने काय फरक पडतो ?

माझ्यासाठी राख हा तुझ्या अस्तित्वाचा शेवटचा पुरावा आहे 
आणि मी तो नीट वाचण्यासाठी नीट वेचणे आवश्यक आहे 




तुझ्या डोळ्यातील काचांची राख झालीये 
आणि दृष्टिहीन हाडांचा गॉगल उरलाय 

तुझ्या हातांतील कष्टांची राख झालीये 
आणि राखाडी घामाची धूळधाण उरलीये 

भटजी रोबोटिकली करेक्ट  मंत्र म्हणतोय 
भूषण रोबोटिकली करेक्ट विधी पार पाडतोय 
हाडे पाच कि चार 
मी म्हणतोय पांच आणि त्यांचा पंचमहाभूतांशी असलेला संबंध सांगतोय 

भटजीचा वैदिक चेहरा मानेनंच 
''तुम्हाला सर्व माहीत आहे का ?''
असं कौतुकानं विचारतोय 
आणि मी अवघडत नजरेनंच हो म्हणतोय 

मंत्र पुढे सरकतायत 
फावडं सरकतंय 

सुरेल मास्टर की हातात असल्यासारखा 
राख गोळा करतोय
भूषण राखही भरतोय आणि गोळाही करतोय  

मध्येच मी फावडं हातात घेऊन  राखेच्या गोळावळ्यात 

आम्ही आगीला पुरून उरलेली हाडं डब्यात ठेवतोय 

तू जी  कधी जगाच्या मिकी माऊसलाही सापडली नाही 
आता कारच्या डिकीत सामावतीयेस 

तुझी जमिनीपासून वर उचलली गेलेली राख घेऊन 
आम्ही नदीकडं निघालोय 



वाऱ्याच्या प्रसन्न पहाटलाटा 
आणि झाडांची देखणी स्थिराईत 

आम्ही डेथरनर असल्याचा फील घेत रसरशीत 

सुरेल तात्विक वाद हे फक्त शैलीयुद्ध असल्यासारखा
बोलणे आणि ड्रायविंग एकत्र विणत 

आम्ही जिवंत पोहचलोय नदीकाठच्या  प्लॅस्टिकच्या कोंडयाळ्यात 

समोर नदीचा प्रदूषणापासून थोडाफार वाचलेला आकार 
शहारा उमटवत

डबा आणि थैल्या बाहेर काढत पाय पावसात सळीदार उभे 

तुझी हलक्या वजनाची राख 
वारा पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर आणतोय म्हणून 
आम्ही  जोर लावून फेकतोय  
आणि ती पाण्यात पडतीये  

का कुणास ठाऊक मला इंडस वॅली सिव्हिलायझेशनची आठवण येतीये 
आपल्या किती पूर्वजांनी अशी ह्या नदीच्या पाण्यात 
प्रेते वा राख फेकली असेल 

तू पाण्यात जमा होतियेस 
आणि तुझ्या शिल्लक आठवणींच्या राखाडी  लाटा 
शेवटचा इतिहास लिहीतायत 

आम्ही पडत चाललोय राखाडी
आणि आमच्या काळजातले टर्मिनेटर 
तुला टर्मिनेट करून 
नेटमध्ये परततायत 



शेवटच्या शक्यता आणि शेवटांच्या शक्यता 

स्वर्ग आणि नरकावर आम्ही चर्चा करत नाही आहोत 

आम्ही शारीरिक पृथ्वीवर परतलोय 
जिथे अणुभट्या टेबललॅम्प असल्यासारखी चर्चा होते 

आम्ही सुरेलच्या राजकारणावर पॉझिटिव्ह चर्चा करतोय 
तू म्हणायचीस 
''जगाच्या अंतापर्यंत माझे व्होट सुरेलला ''

तीन कुत्री फुटबॉल खेळत 
एक मांजराचे पोस्टर पृथ्वीचा उंदीर तोंडात पकडणारे 
निवडणुकीची ग्राफिटी मिरवणाऱ्या असंख्य भींती 

दृश्ये डोळ्यांशी मांडवली करत 
त्यांना भांडवली करत 

दोन खुर्च्यांच्या मध्ये मृत्यू बसला 
आणि त्याने आम्हाला ऑर्डरी दिल्या 

कारमध्ये आता ह्या क्षणी त्याचा आवाज नाही 

शांतता  डिव्हाईन हातांनी आवाजांचे लाडू वाटतीये 
आणि माझ्यात त्यांचा प्रसाद होतोय 

मी स्वादिष्ट होत तुझ्या मृत्यूतून बाहेर पडतोय 

श्रीधर तिळवे नाईक 


(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )


अभावाच्या कविता 
श्रीधर तिळवे नाईक 


तुझी राख पाणवुन आल्यानंतर 
दारात पुन्हा सांत्वन उभे 

सांत्वन तुला रिप्लेस करू शकतं का ?
मग हा संस्कार कशासाठी ?

कुणाच्या मृत्यूनं माणसं खरोखर जखमी होतात काय ?
जर जखमी होतात तर शहाणी का होत नाहीत ?




मंबाजी आपल्या मित्रांच्यातच असतात 
फरक इतकाच 
अनेक मंबाजींना ते खरे तुकाराम आहेत असं वाटत असतं 

ज्यांना माझ्या कविता बुडवता आल्या नाहीत 
म्हणून ज्यांनी त्या थोपवल्या त्यातील एकाचा फोन 

त्याला औपचारिक दुःख झालंय 
आणि तो उपचार म्हणून बोलतोय 

उपचार !

''लोकांना मेल्यानंतरही उपचार का पाळावेसे वाटतात ?''
भूषण विचारतोय 
''त्याला समोरचा मृत्यूमुळे दुःखाने आजारी पडलाय 
असा भ्रम झाल्याने किंवा 
सांत्वनखोरांच्या लिस्टमध्ये आपलेही नाव 
दर्ज व्हावे असे वाटल्याने ''
मी उत्तर देतोय 

लोक संकेतातच इतके अडकलेत 
कि दुःख फील करणे विसरून गेलेत 

लोक डिजिटल 
त्यांचे दुःखही डिजिटल 



बुद्धत्व प्राप्त झाले कि 
त्याचं सर्वाधिक वैष्यम 
आसपासच्या माणसांना होतं 

आताआतापर्यंत आपल्याशी वाद घालणारा 
चॅटिंग करणारा 
फालतू पोस्टिंग करणारा 
कंमेंटणारा  
जेवणारा 
भांडणारा 
बुद्ध ?

अशक्य ! त्रिवार अशक्य !

तुझं असं झालं नाही 
'' तू पोहचलास मी कशी पोहचेन ?''

'' तुझ्या सगळ्या कविता जुनाट वाटतात राजू 
तू आत्ताचा भलताच आहेस ''

मी उत्तरे देत नाही 

निर्वाणात प्रश्नांचा अंत होतो 
आणि उत्तरे काल्पनिक होऊन गळून पडतात 

सांत्वन करू पाहणाऱ्यांना कळत नाहीये 
मला सांत्वनाची गरज नाहीये 
ते सांत्वन करतायत 
आणि मी त्यांचे अहंकार परंपराशरणता पाहात 
शून्याच्या खुर्चीत बसून आहे 



संगीतात दाखल झालेलो मी 
अचानक तुझ्या मृत्यूने 
कवितेत दाखल झालोय 

कविता एकेकाळी माझ्यासाठी साधना रिफ्लेक्ट करणारी रिफ्लेक्टर  होती 
आता एक्सप्रेशनल बॉक्स झालीये 

देह कागदावर लिहिला जातोय 
आणि देह कवितेचा देह 
भाषिक देह म्हणून पाहतोय 



माणसांना  आठवणींची कन्फेशन्स  का द्यावीशी वाटतात ?
कि तुझा अभाव अधोरेखित करण्याची ही घाई आहे ?
कि तुझी उपस्थिती त्यांच्याही मेंदूसाठी किती महत्वाची होती 
ह्याची खबर देण्याची ही तडफड आहे ?

 काही डोळे अस्सल दुःखाचे 
काही दुःखाची नक्कल मारत 

प्रार्थना जेवण आणून देते 
आईला बीपीची गोळी देते 
आणि निघून जाते 

ह्यापुढे घरात कोण जेवण बनवेल ?
ह्यापुढे आईला कोण सांभाळेल ?

तुझ्या मृत्यूनंतरचे खरे प्रश्न आता सुरु होतायत 

अभावाच्या पुऱ्या तळल्या जातायत 
अनुपस्थितीचे शंख आवाजाचे डंख मारतायत 

तुझ्या पंचेंद्रियांचा घमघमाट ह्या घरासाठी किती महत्वाचा होता 
हे जेवणाचा प्रत्येक पदार्थ सांगतोय 

तुझ्या गव्हाळ त्वचेचा शिडकावा आता नाही 

''तू काय मुंबईत जाशील 
रुटीन होशील 
आमचे काय ?''




प्रभावाच्या चिंता त्यांना सतावतात 
ज्यांना स्वतःच्या ओरिजनॅलिटीविषयी शंका असतात 

आपण ईश्वराची डिस्टोर्टेड कॉपी आहे 
हे मी पायरसी पहात पहात शिकलो 
आणि ओरिजनल झालो 

मी आताशा लिहीत नाही 
फक्त लिहिला जातोय 

माझ्या देहातून डाउनलोड होणारा तुझा मृत्यू 
आणि टप्प्याटप्प्याने कागदात श्वास घेणारी स्तब्धता 

तू ह्या कविता वाचणार नाहीस 

तुझा मृत्यू 
माझ्या कवितेच्या एका वाचकाचाही  मृत्यू आहे 
आणि माझा देह  तो भाषेबाहेर राहून भाषेत ओततोय 



अभावाचे प्रॉडक्शन सुरूच आहे 
मृत्यू ही अभावाची फॅक्टरी आहे का ?

तू नसायचीस तेव्हा अभाव स्टेरियोटाईप असायचा 
आता त्याला चेहराच नाहीये 

घराचं सगळं पोटॅन्शिअल सडून सडून वाहून चाललंय 
आणि सुप्तखोरीचा साळसूदपणा साळोता घेऊन कचरा झाडतोय 

गावकरी तुझ्या अभावाचा पॅराडॉक्स पेलत 
सांत्वनाच्या इनबॉक्समध्ये येतायत जातायत 

फेसबुकवर पोस्टी टाकणाऱ्यांच्यात आणि ह्यांच्यात काय फरक आहे ?



आई तुझ्या रिलेव्हन्सच्या कपबश्या उचलतीये 
रिलेव्हन्स पितीये ठेवतीये 

तिच्या आयुष्यातील  तुझा सिग्निफिकंस मचूळ चुळा भरतोय 

माया तिला आंघोळ घालून गेलीये 

पाण्याला तुझा वास नाहीये 

मृत्युवरचे बोलणे लिहिणे अंतिमतः मूर्ख ठरते 

आईचे बोलणे संपून आता अश्रू  सुरु झालेत 

शेवटी तू तिची मुलगी होतीस 
ऑर्डर पाळणारी 
आज्ञाळू  

तिची नोहा आणि नौका दोघेही बुडून गेलेत 

घरभर पाणी 

घरबुडी 



सदैव सैनिका पुढेच जायचे 
न मागुति तुला कधी न पहायचे 

पोकळी रणगीत गातीये 
आणि देह पोकळ बांबू झालाय 

१०

''एक डिलिटची की दाबली गेली 
आणि सगळा कम्प्युटर उध्वस्त झाला ''

रामदासदादा  ओल्या आवाजात भळभळतोय 
त्याच्या जखमांची साखळी झिणझिणतीये 

तो तुझ्याबद्दल शोक व्यक्त करतोय 
आणि नुकत्याच गेलेल्या त्याच्या तरुण मुलाबद्दलही 

तिळव्यांच्यात एकामागून एक मृत्यू होतायत 
आणि तिळवे अगतिकतेची विषकन्या चुंबत 
मृत्यूत हलतायत 

मी त्याच्या हातावर हात ठेवत त्याला हलकं करतोय 
आणि तो आपल्याच वजनाखाली आपलाच हात ठेवत 
घराबाहेर पडतोय 

११

तुझ्याही मृत्यूचा डाटा हळूहळू ऍबस्ट्रॅक्ट होत चाललाय 
आणि जो तो परततोय स्वतःच्या की बोर्डवर 
ज्याच्यावर नथिंगनेसची की उपलब्ध नाही 

हे घर पुन्हा एकदा आमच्यापुरतं उरलंय 
आम्ही जो सहा होतो 
आणि तुझ्याविना पांच झालोय 

दारातला अनंत फुललाय 
आणि झाडांची शतपावली पुन्हा एकदा ऐकू यायला लागलीये 

मी अनंतात हात हलवतोय 
आणि माझ्या हातातून
तू धारण केलेल्या नव्या  चेहऱ्याची फुले पडतायत 

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

**************************************


भारत श्रीधर तिळवे नाईक 

''भारत माझा देश आहे 
आणि ह्या देशावर माझे प्रेम आहे
ह्या देशाचा सार्थ अभिमान म्हणून 
मी माझ्या मुलाचे नाव भारत ठेवत आहे ''

भाऊंचा आवाज , भारतचे  नामकरण 
आणि भारतचा देह 

तू आणि बायजी आणि तुमचे बेहिसाब प्रेमळ हात 

''माझं ताईवर सर्वाधिक प्रेम आहे तुमच्यापेक्षा '' इति भारत 
''असं आहे तर उजूला इतका त्रास का देतोयंस ''इति मी 

हा नेहमीचा डायलॉग नाही 
आहे तो ह्या डायलॉगचा टोकदार अभाव 
आणि त्याचे भारतला आलेले काटे 

तो संजय स्वामींच्या हॉटेलातील नोकरी सोडून परतलाय 
आणि तुझ्या मृत्यूनंतरच्या सुन्न खिन्नतेत हरवलाय 


मी मृत्यूविषयी आणि जीवनाविषयी एकाच आवाजात बोलतो 

तुझ्या मृत्यूची बातमी मी भारतला दिली 
आणि भारत त्या आवाजात कोसळत साऊंडप्रूफ झाला 

त्याला झालेले डंख आम्हाला दिसत नाहीयेत 
पण त्याला गिळत चाललेला नाग आम्हाला दिसतोय 


भारत दुःखाचं नाटक करतोय 
कि भारत खरोखर दुःखी झालाय ?

भारतबद्दल कुणालाच अंदाज येत नाहीये 
त्याच्या अंडरवर्ल्डचा भोपळा टुणूक टुणूक करत सगळ्यांना नाचवतोय 
आणि घरभर बिया वाटतोय 


भारत निदान अंघोळ तरी कर 
भारत अंघोळ करत नाहीये  

भारत निदान कपडे तरी घाल 
भारत कपडे घालत नाहीये 

भारत दुःखातून बाहेर ये 
भारत दुःखातून बाहेर येत नाहीये 


लोक भारतला डिस्टर्ब करू पाहतायत 
आणि त्या प्रयत्नात स्वतःच डिस्टर्ब् होतायत 


सांत्वनाच्या बागेतून मी रोज आईला बाहेर काढतोय 
आणि माझ्याबरोबर ती रोज जंगलात येऊन गाणी गाते 
लोक रोज तुझ्या आठवणी काढून 
तिला पुन्हा बागेत न्हेऊन सोडतायत 

आई एकाचवेळेस दुःखी होतीये 
आणि मूळची आनंदीही 

तिचा भक्तिमार्ग अजून फळाला आलेला नाही 
मात्र तो तिला जंगलाविषयी सक्षम करतोय 

भारत ना धार्मिक ना अध्यात्मिक 
देवापेक्षा कोल्हापूरचे मटण आधिक चविष्ट मानणारा 

त्याने तू गेल्यापासून दारूला हात लावलेला नाहीये 
आणि त्याच्या आत कसली दारू तयार होतीये 
ते कळत नाहीये 


''भारत नाकीनऊ आणतो नाक कापतो ''

तुझा तक्रार करणारा आवाज 
आणि 
''तायडे तुझ्यावर माझं प्रेम आहे ''
असं भारताचं बरळणं 

सतत तलवार उगारणारा त्याचा हात फक्त दोन गोष्टींना घाबरतो 
एक तू एक मी 
आता तू निघून गेलीयेस 
आणि भारत कायमच्या घबराटीत लुप्त होतोय कि काय 
ह्या शंकेने सगळे घाबरलेत 

त्याने मृत्यू आतून पाहिलाय काय ?


''तुझा भाऊ एक ना एक दिवस 
कोल्हापूरच्या एखाद्या गल्लीत मारला जाणार बघ राजा 

त्याला समजाव 

तुझ्या भावाने असं मर्डरमध्ये मरणं 
तुला साजेसं आहे काय ''

मित्रांचे शंकाग्रस्त फोन कायमच 
माझे कान टोचत राहिलेले 
आणि हा असा साऊंडप्रूफ भारत 
खुर्चीत खिळलेला 

मी दादागिरी केली म्हणून ह्याने दादागिरी केली 
मी मेडिटेशन केले म्हणून ह्यानं मेडिटेशन केले 

माझ्या पावलावर पाऊल ठेवण्याचा हा अट्टाहास 
मला कधीच पटला नाही 
आणि आता हा माझ्या मृत्यूची आयडिया फॉल्लो करतोय कि काय ह्या शंकेने मी अवघडलेलो 

मी म्हणायचो 
''भारत मी मृत्यूला घाबरणार नाही 
मी जैन मुनीप्रमाणे अन्नपाण्याचा त्याग करून 
काळपाबाहेर जाऊन एकातांत हत्तीप्रमाणे मरेन ''

भारत अन्न खात नाहीये 
पाणी पीत नाहीये 
तो कळपाबाहेर चाललाय का ?


आयुष्य कसं जगायचं 
हे ठामपणे ठरवणारे लोक 
कसं मरायचं हेही ठामपणे ठरवतात 

मृत्यूच्या डोळ्यात डोळा घालून बघायची माझी लहानपणापासूनची खोड 
तारुण्यात वृक्ष  झाली 
आणि मी आत मरण्याची प्रॅक्टिस सुरु केली 

भारत आत मरण्याची प्रॅक्टिस करतोय का ?

१०

गावकऱ्यांना सगळं अनाकलनीय आहे 
ते त्यांच्या चष्म्यातून भारतला पाहतायत 
आणि भारत आता कपडे काढून 
बिनदिक्कत सर्वत्र वावरतोय 

ही दादागिरीची नवी सुरवात 
कि जुन्या दादागिरीचा नागडा मृत्यू ?


११

माया घाबरलीये प्रार्थना घाबरलीये तृप्ती घाबरलीये 
फक्त भारत घाबरलेला नाहीये 
कि भारत मृत्यूलाच घाबरलाय ?

मी भारतला विचारतोय 
''तुझे हातपाय का कापतायत ?''
आणि अचानक तो कोसळतोय 
मी पकडतोय 

श्वास थबकलेत 

ऍडमिट करूया 

भूषण भारतला घेऊन हॉस्पिटलकडे 
आणि आई व्हीलचेयरवर उदास अंतःकरणाने मलूल 
शिशिरात बसलेली 


१२

रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि 
भारत तरीही आजारी आहे 

त्याचा एकही दारुड्या दोस्त 
त्याला बघायला आलेला नाही 

मी त्यांना कॉल करतोय 
पण दारू शेअर करणारे 
आजार शेअर करायला तयार नाहीत 

माझा टॅबलेट डेड होत चाललाय 


१३

मी भारतला चड्डी चढवतोय 
त्याचा नागडेपणा हा वेडसरपणा 
कि शहाणपणा हे ठरवता येत नसल्यानं 

तो काही खातपीत नसल्याने 
मी हळूच हलक्या हातानं त्याच्यापुढे स्लाईस आणून ठेवतोय 

आंबा त्याचा विकनेस असल्याने 

तो दोन घोट स्लाइस पितोय 
आणि पुन्हा त्याच्या खुर्चीत परततोय 

एक हताशता संपूर्ण घरभर 
आणि भारतपुढे आंब्याची लिक्विड फोड स्लाईस 


१४

प्रिया सचिन बायजी भावोजी आलेत 
आणि वातावरणात तुझ्या मृत्यूचा गारठा पुन्हा पसरतोय 

प्रियाच्या दुःखाला खिडक्या फुटतायत दारं फुटतायत 
बायजी तुझ्या हॉस्पिटलमधील मृत्यूच्या तपशिलांना जिवंत करत व्याकुळ 
व्याकुळतेचा एक हंगामच सुरु होतोय 
आणि तुझ्या कॅन्सरविरुद्धच्या लढ्याचे व्हीडिओ निघतायत 

तू गेलीस तेव्हा आख्ख हॉस्पिटल कसं रडलं आणि काय काय 

तुझ्या चांगुलपणाचे कित्येक पुरावे सादर होतायत 

प्रियाला  एकांतात घनव्याकूळ होऊन रडायचं आहे 
पण तिला रडायला फ्लॅटफॉर्मच मिळत नाहीये 

तिच्या डोक्यात तुझ्या जाण्याचे गच्च दुःख 
आणि मेंदूचे केस सुट्टे होत नाहीत म्हणून 
अश्रूंच्या बुचड्यात बांधून ठेवलेल्या पंचगंगा 


१५

शोकांच्या वस्त्रांचे ढीगच्या ढीग 
आणि भारत त्या ढिगात ढगासारखा नागडा 

हळूहळू ढग मोठा होतोय 
आणि असला पाऊस सहन करण्याची ताकद नसल्याने 
जो तो पलायन करतोय 

बायजी भावोजी  निघून गेलेत  
आणि मी ढगाला बर्म्युडा चढवतोय 


१६

'' ढगाला ढगासारखं राहू दे भूषण 
त्याला कोल्हापूरच्या पावसात धाड 
शेवटी तो पंचगंगेचा ढग आहे 
कोल्हापुरात जाईल तर तरंगेल 
गोव्यात राहील तर स्वतःतच बुडेल ''

मी भूषणला निरोपतांना सांगतोय 

धार्मिक विधींचे कम्पल्शन आल्याने 
मी तुझ्या अस्थिविसर्जनाला गेलेलो नाही 
मात्र तुझं प्रत्येक हाड माझ्यात हसतंय 

मी स्माईली कधीच गोळ्या केल्या नाहीत 
कारण तुझे जेनुइन लाफ्टर माझ्यासोबत होते 

रिच्युअल्समध्ये मृत्यू अडकवून त्याला पेलणारा भूषण 
तुझ्या मृत्यूमुळे ढग झालेला भारत 
आणि आत कायमचा मृत्यू पाऊन देहापुरता उरलेलो मी 
आम्ही तिघेही तुझ्या मृत्यूने पुन्हा एकत्र आलो 
आणि आता ह्या एकत्रीकरणातून 
मी माझा देह बाहेर काढत 

मी घरातून  बाहेर पडतोय 
आणि घरातला अनाकलनीय ढग मला म्हणतोय 
'' दादा , काळजी घे 
छत्रीची तुला सवय नाही म्हणून म्हणतोय ''


श्रीधर तिळवे नाईक 


(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )




पाणी श्रीधर तिळवे नाईक 



''मीहेय ''
हे मराठीतील सर्वात छोटं वाक्य आहे
आणि ते सर्वत्र वावरतंय

''तू नाहीयेस ''
हे मराठीतील सर्वात वाईट वाक्य आहे
आणि ते आसपास भिरभिरतंय



मी चाललोय
मडकई ते फोंडा बस पकडून
सर्वांगाला शून्याची लागलेली शेंडी पेलत

माझ्या आत उमललेला नारळ
क्षणाक्षणाला
नवं खोबरं तयार करतोय



एकतर मुंगी मेरू पर्वत गिळते
किंवा मेरू पर्वत मुंगीला गिळतो

तुला गिळून मेरू पर्वत नाहीसा झालाय
आणि पाठीमागे त्याच्या पाऊलखुणाही नाहीयेत

मी तुझं तेरावं करायला नकार दिलाय
आणि कधी न्हवे ते भूषण
माझ्या बाजूने उभा राहलाय



मी सासरला निघालोय
आणि माहेरात काहीच शिल्लक नाही

तुझ्या आठवणींच्या मुंग्या
कुठं झोपी गेल्या ?

माझ्या डोळ्यात तुझा  शिल्लक चेहरा नाहीसा होतोय

माझ्या मोबाईलला बहिरी बायको मिळाली का ?

स्वतःचच घर विदेश असल्यासारखा
मी घरात उतरलो आणि आता निघालोय

शहामृगाच्या डोळ्याने
शहामृगाचा मेंदू गिळून
शहामृगाचा देह वाळवंटात वाळत घातला काय ?

मृत्यू अपडेट करता येत नाही
कारण तो अँप नाही
बाप आहे

तू कायमची रिटायर होऊन
कागदपत्रं सोडून निघून गेलीयेस

फुलपाखरांनी पायांचा त्याग करून
नाक बसवून घ्यायला सुरवात केलीये का ?




नेहमी स्टेशनवर सोडायला येणारा भूषण
सोबत नाही
माझ्या डब्यात तू बनवलेला खाऊ नाही
तू दिलेली पाण्याची बॉटल नाही

अलीकडं माझं सारं बदललंय

चार जिफीत माझ्या कुंडलिनीचं जिराफ
डोळे उघडे ठेवून शंभरदा शिंकते
आणि आठ जिफीत मेंदूचा हत्ती दहा उड्या मारून
माझे चप्पल शोधून आणून देतोय

हे निर्वाण आहे कि काय आहे
कि सविकल्प समाधीचा आणखी एक आभास आहे ?

गॉड स्पॉट नंतर मीही सावधान झालोय

ह्यापूर्वी तीन वेळा मी निर्विकल्पच्या आसपास  जाऊन आलोय
आणि निर्वाण न मिळवताच
रिकामा हात हलवत परत आलोय

मला स्वतःलाच धोका देणारा ओशो व्हायचं नाहीये
मला खर्रर्खुर्र निर्वाण हवं आहे

पूर्वी बुद्धत्व डिक्लेर करणं फार सोपं होतं
पण आता विज्ञानाने ते इन्वेस्टीगेशनच्या कक्षात आणायचा प्रयत्न चालू केलाय
अजूनही विज्ञानाच्या हातात फक्त घंटा आहे
आणि माणूस हवालदिल

मी आयुष्यात इतके खोटे बुद्ध पाहिलेत कि
माझी लिस्ट रामकृष्ण रमण जे कृष्णमूर्ती
ह्यांच्यापलीकडे जात नाही

ज्यांची साधी दारू सुटलेली नाहीये
असेही लोक अधिकारवाणीने निर्वाणावर बोलतायत
आणि फेसबुकवर पोस्टीही टाकतात

निर्वाण ही नवी करमणूक आहे
आणि रिकामटेकड्या लोकांची टेकडीही

माझ्या डाव्या बाजूला दोन फॉरेनर निर्वाणावर बोलतायत

ज्या प्राण्याची जीभ
सर्वात बलवान मसल आहे
तो डिजिटली बोलबच्चन होईल नाहीतर काय

अनंतानं मला लिथोलॉजिकल बनवलंय
तरीही मी तुझ्यावर भारतवर कविता लिहितोय

तू विचारायचीस
''इतक्या कविता लिहून कंटाळत नाहीस का ?''
मी म्हणायचो
''म्युकस तयार करून
जठरं कंटाळतील काय ?




मृत्यू होकार देतो कि जीवन नकार देते ?

कि दोघेही दोन्ही बाजूंनी वाहतात ?

माझ्या गळ्यात तहानलेलं मांस उगवतय
आणि पोटात आत्तापर्यंत कळ काढलेली भूक गुरकावतीये

मी कॅन्टीनकडे
दुष्काळी पावलांनी
मुबलक मोफत  श्वासांनी

''पाणी दे रे ''

पाणी येत नाहीये

दुसरा वेटर ,'' ऑर्डर साहेब ''

''मसाला डोसा !''

मसाला डोसा संपला तरी पाणी येत नाही

मी पाण्याशिवाय बाहेर
माझ्या आत व्याकुळतेचे  मासे तयार होतायत



माणसांचा समुद्र
सरोवरांएवढे तुकडे पाडत
ट्रेनमध्ये शिरतोय

सर्वत्र फक्त खुर्च्या

आसनयान
झोपण्याची व्यवस्था नाकारून
प्रवाश्यांना बसण्यात कोंबण्याची शासकीय योजना

तोंडांचे ढोल वाजतायत
भाषा बडवतीये
आवाजांचे निखारे पडतायत विझतायत


तीन चार नितळनव्या सोडून
बाकीच्या सर्वच ब्यागा
प्रवास करून करून आजारी पडलेल्या

कागदी नावेसारखा मी बसतोय

मला पाणी हवंय
आणि पाणी विकणारा एकही हात
माझ्या डब्यात उगवत नाहीये




तहान लागल्याशिवाय मी आताशा पाणी पीत नाही
मी गेले सहा तास पाण्याचा थेंबही पिलेलो नाहीये
मला सहा तास तहान लागलेली नाहीये

आत्ता अचानक रक्तात शंभर बाईक्स फिरतायत
आणि गळा टोचतायत

तहान बासरी वाजवतीये
आणि त्वचा पाण्यासाठी रक्त पिंजतीये

मला पिंजणंपैंजणं ऐकू येतायंत
तहान पूर्वी कधीच अशी ऐकू यायची नाही

सर्वत्र सर्च इंजिनवर पडणारी माझी बोटं आता शांत झालीयेत
मी शारीरिक पाणव्याकुळता मांजराप्रमाणे गोंजारत बॅग लावतोय

आजोबांचे भक्त आणि वडिलांचे रक्त चुकवत मी साधना केली

'' जरा बॅग लावून देता का पलीज ''

मी  बॅग अवकाशात सेट करतोय

सूर्याची सावली बॅगेच्या आत बॅगेच्या बाहेर
तिच्या सावळ्या चेहऱ्यावर घामाचे पाणीदार  थेम्ब

तीन पात्याचा पंखा हवा दळतोय

तिचा मुलगा खिश्यातुन मोबाईल काढतोय

गेम आणि ट्रेन  एकाच मूडमध्ये
माणसांची बोटं झेलत ऑन



झपाझप माणसे चढत
बॉक्सच्या ढीगापुढे कोंडाळे करतायत

त्यांचे  निळे  गणवेश आकाशाचे ऍप मिरवत
ज्याची आयकॉन माणसे
रोबोटिक हातवळणांचा सराव फिरतोय
आणि सर्व काही सेट होत बॉक्सेसपासून भिंत तयार होतीये

त्वचा  पाणी पितायत
आणि पाणी त्यांचे गळे मायेनं जवळ घेतंय

१०

माझ्या शेजारी मुलाचा काका
फोटो गॅलरी ओपन करत

मुलाचे असंख्य चेहरे तयार होतायत
उंदीर , सिंह , मिश्या ,
असंख्य गोष्टी त्याच्या सेल्फीला चिकटतायत
आणि मुलगा हसतोय

मग नवीन सेल्फी
आणि पुन्हा नवीन चेहरे

इतक्या लहान वयात स्वतःचे असंख्य चेहरे
सहजरित्या कॅरी आऊट करत
बदलवत ऍड करत मायनस करत

जांभळ्या सिंहाचा हिरवा ससा
खोट्या मिश्या त्यावर दोन सूर्य
झाडांना फळाऐवजी मुलाचे चेहरे

कॉईन्स पडतायत
डिजिटली कॅश होतायत

मी समोसा घेतोय
मुलगा मोबाईलमध्ये वाकून सामोसा खातोय
त्याची सेल्फी सामोसा खात नाहिये
ती बॅटरी खातीये

११

''जिथे आहे तिथेच असण्याचा तुझा  स्वभाव
आधिकच गडद झालाय दादा  ''

भूषण बोलतोय

''आईला सांभाळ ''
''हो दादा ''
''भारतला कोल्हापूरात शिफ्ट कर ''
''ह्या रविवारी प्रयत्न करतो ''
''ठेऊ ?''

सर्वांचेच मोबाईल ऑन
जणू हाताचे एक्स्टेन्शन

मला कधी न्हवे तो पाणीवाला दिसतोय

''पाणी''

''सर , अभी अभी लास्ट बॉटल दिया ''

तो निघून चाललाय
त्याच्या पाठीवर मिनरल वॉटरची बॉटल आहे


१२

आलिया भटचे भले मोठे पोस्टर पुढील सीटवरून
माझ्या मार्तंड डोळ्यापुढे

''लडकी ब्युटीफुल कर गयी चूल ''

''प्रेसिडेन्ट कौन इससे क्या फरक पडता हैं ?''

''कोईभी हो गादीपे
आपना ध्यान मादीपे ''

मग बुरखेवाली रंडीयोन्का दलाल
काल्पनिक कि रिअलवर घमासान चर्चा

आयकॉनिक फ्लो
आणि ताओ

शून्याचा गोल गोलमटोल करत ट्रेन आणि सेल्फीज धावतायत
मेलेल्या माणसांची कार्टून्स जमवत
ही जिवंतपणाची सावली कुठं चाललीये ?


१३

ब्यागवाली पाण्याची बॉटल काढतीये

तिच्या गळ्यातून पाण्याच्या कोलांट्या
आणि पाणी पितानाचा आवाज टुबक टबक

ती पाणी ऑफर करत नाहीये
प्रत्येकाने दुसऱ्याकडे बॉटल असणार हे गृहीत धरलंय

पाणी विकाऊ झाल्यामुळे ?
कि पाणी महाग झाल्यामुळे ?

पाणी देणे म्हणजे पैसे देणे
ते कोण असेच देईल ?

१४

स्टेशनामागून स्टेशनं  मागं पडतायत
पाणीवाला येत नाहीये

माझ्या तहानेची मला गंमत वाटतीये

बिर्याणी बिर्याणी

मी बिर्याणी विकत घेतोय
बिर्याणीवाल्याकडे पाणी नाहीये

हाडांचे निवडुंग झालेत

माझ्या टॅबलेटवर टीव्ही ऑन झालाय
शेजारच्या टॅब्लेटवर गूगल इमेजीस

दोन्हीतही सूर्य

पोरगा मला म्हणतोय
''चौकोनात बघून बघून सूर्यपण चौकोनी दिसायला लागलाय काका ''

मी म्हणतोय
''कविते जा आणि त्याचं वाटोळं कर ''

मग त्याचा भाऊ
'' आलिया जा आणि कालियाचं  वाटोळं कर ''

आम्हा तिघांच्यात एक नवीनच खेळ ऑन झालाय
आणि आम्ही स्क्रीनवरच्या अनेक वस्तूंचं वाटोळं करत चाललोय

१५

झोपेचा ढग डोळ्यात

वारा शांतपणे कपडे काढत

मी स्वप्नहिन झोपतोय

अचानक पाऊस सुरु झालाय
आणि ट्रेन भरून गेलीये

माझ्यापुढे माणसांचे लोंढे

मी पुन्हा झोपेत


१६

स्टेशनची लख्ख जाणीव
माझ्या मेंदूत टॉर्च टाकते

मी उठतोय
आणि पाहतोय
तर समोर बॉक्सेसमध्ये
पाण्याच्या  बॉटल्स
खानपान सेवेतल्या ?

त्या बघून पाणीवाला आमच्या डब्यात येत न्हवता ?

माझी तहान हसतीये


१७

मी दादर स्टेशनवर -पूलावर
आणि अचानक प्रचंड पाऊस
इथे तिथे सर्वत्र

मी आ वासलाय
आणि माझ्या गळ्यात पावसाचे थेट पाणी

माझी तहान पूर्ण शमलीये

मी तृप्त तुडुंब देहाने -अनंतात -
मृत्यूच्या  पार  अपार चालत -पारदर्शक- पाणीदार

श्रीधर तिळवे -नाईक 
*****************************************************































श्रीधर तिळवे नाईक 


(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )