ऐटोबायोग्राफी श्रीधर तिळवे नाईक
आईला मुलगा हवा होता
होत न्हवता
स्पर्म बनून घुसलो
आई म्हणते तू पोटात असतांना मला साधी लाथ मारली नाहीस
आजोबा म्हणाले तू शिवाचा अवतार
मी म्हणालो डोक्यावर गंगा कुठाय गळ्यात नाग कुठाय
शिक्षकांनी विचारलं तुला काय व्हायचंय गांधी नेहरू बोस
मी म्हणालो मला काही व्हायचंच नाही
शिक्षकांनी विचारली तुझी जात काय
मी म्हणालो बापानं कधी सांगितली नाही
शिक्षकांनी त्यांना जी वाटते ती जात लिहिली
शिक्षकांनी विचारलं तुझा जन्म कधी झाला
मी म्हणालो मला माहित नाही
शिक्षकांनी त्यांना वाटतं तो बर्थडे लिहिला
वालावलकर सरांनी माझ्या बापाला विचारलं
ज्याला काहीच करायचं नाही अशा विद्यार्थ्यांचं करायचं काय ?
मी म्हणालो हा तुमचा प्रश्न आहे माझा नाही
कुस्ती केली क्रिकेट खेळलो फुटबॉल खेळलो मारामाऱ्या खेळलो
शाळा चुकवली
गुळवणी सर म्हणाले तू नापास होणार
मी फर्स्ट क्लास मिळून पास झालो
सायन्स घेतलं तर चालता चालता सत्याने दैवी उडी मारली
लायब्ररी वाचली पण ती उडी काही मिळाली नाही
सायन्स घेतली सोडली
आर्टस् घेतली उभा इतिहास आडवा वाचला
बक्षिसं जिंकली गटारात सोडली
तहान लागली तेव्हाच पाणी प्यालो
भूक लागली तेव्हाच जेवलो
काम जागला तेव्हाच जुगलो
कविता लिहिल्या सौष्ठव काढलं प्रस्थापित कवितेला जुमानले नाही
अभिधाची व्यंजना केली
कादंबरी लिहिली १२०० पानाची जी साईजमुळं छापनेबल नाही
असं खुद्द पॉप्युलर प्रकाशन म्हणालं
लग्न केलं नाही लिविंग रिलेशनशिपमध्ये राहिलो
संन्यासी झालो पण ना आश्रम घेतला ना मठ
लोक म्हणाले सोसायटीत प्रवेश नाही
मी एकट्यानं राहण्याच्या जागा शोधल्या
मुंबईत जिथे निसर्ग अशा ठिकाणी मुक्काम ठोकला
पोरी प्रेमात पडल्या मी शिंगावर घेतल्या
लोक म्हणाले हे कसं
मी म्हणालो कन्डम न्हवता तोवर ब्रम्हचर्य ठीक होतं
अंडरवर्ल्ड आलं आभाळात उडवलं
ओव्हरवर्ल्ड आलं ते पाताळात घातलं
मिडलवर्ल्ड आलं त्याचं विमान केलं
नोकरी केली नाही
कैक धंदे केले
हमालीपासून व्हिजिटिंग लेक्चरशिप पर्यंत
लोक म्हणाले असिस्टंट न होता डायरेक्टर होता येत नाही
झालो
लोक म्हणाले आधी छोटे छोटे अकादमीक पेपर वाचावे लागतात
म्हणालो वाचेन तर मोठ्या ठिकाणी वाचेन
थेट जेएनयूत पहिला पेपर वाचला
सगळे इंटुक बकवास वाटलं म्हणून पुढे पेपर वाचले नाहीत
लोक म्हणाले ज्याला शास्त्रीय संगीत येत नाही
त्याला म्युझिक डिरेक्टर होता येत नाही
झालो
इलेक्शनला ज्यांच्या जाहिराती केल्या
सगळे निवडून आले
त्यांनी विचारले काय पाहिजे
मी म्हणालो घंटा
शब्द दिले पाळले शक्यतोवर वचने जगलो
हल्ले झाले
जे मारायला आले त्यांनाही दोस्त केले
जीव खाऊन साधना केली
पोहचलो उतरलो
आणि तुम्ही विचारताय
ट्रान्सलेशनविषयी तुम्हाला काय म्हणायचंय
कविता ट्रान्सलेट करता येतील
पण अख्खा कवी ट्रान्सलेट करता येतो का बाई
ज्याला काहीच करायचं न्हवतं अशा माणसाचं काय करायचं
ओरिजिन नाहीसं झालेल्या माणसाचं काय करायचं ?
श्रीधर तिळवे नाईक

No comments:
Post a Comment